Breaking News

अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा ! अमित शाहना पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून सांगितली स्वत:ची ओळख

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असून या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अवैध पध्दतीने निलंबित सहाय्यक पोलिस इन्सपेक्टर असलेल्या सचिन वाझे याच्याकडून कोट्यावधी रूपये गोळा करण्याचे आदेश दिले. याप्रकरणात अजित पवार आणि अनिल परब यांची नावे वाझे याने घेतलेली असल्याने या दोघा जणांची केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी आज एका पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली.

त्याचबरोबर राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून या सरकारकडून राजकिय बदला घेण्यासाठी विरोधकांच्या विरोधात सत्तेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

निलंबित सहाय्यक पोलिस इन्सपेक्टर सचिन वाझे याला अँटालिया स्फोटकप्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एनआयएने अटक केली असून तो त्यांच्या कोठडीत आहे. वाझे याने दिलेल्या हस्तारक्षातील जबाबात गुटखा विक्रेत्यांकडून १०० कोटी रूपये गोळा करण्याचा निरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घोडावत याच्या मार्फत दिल्याचा कबुली वाझे याने देत सैफुद्दीन बुऱ्हानी ट्रस्टच्या संचालकांकडून ५० कोटी, मुंबई महापालिकेच्या मुख्य कंत्राटदारांकडून २ कोटी, तर उपकंत्राटदारांकडून ५० लाख   रूपयांची खंडणी वसुली करण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आपल्याला दिल्याची कबुली वाझेनी आपल्या लेखी जबाबात न्यायालयात एनआयएच्या न्यायालयाता दिली. त्यानुसार या दोघांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगत याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी अमित शाह यांच्याकडे केली.

आदरणीय सर, मी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असल्याची ओळख प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वत:ची करून देत महाराष्ट्रात भाजपाचे १.१० कोटी सदस्य आहेत. २४ जून २०२१ रोजी झालेल्या राज्य कार्यकारणीत यासंदर्भात ठराव करण्यात आला की, सचिन वाझे प्रकरणातील चौकशी सुरु नसलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्याची. त्यावेळी राज्यातील जिल्ह्याचे २००० हजार पदाधिकारी उपस्थित होते. त्यानुसार मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपल्याकडे सीबीआय चौकशीची मागणी या पत्राद्वारे करत आहे.

Check Also

त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *