Breaking News

पराभूत होवूनही भाजपाची शिवसेनेवर टीका शिवसेनेला भोपळा मिळाला : चंद्रकांत पाटील; शिवसेनेने आत्मचिंतन करावे : देवेंद्र फडणवीस

मुबंई: प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत महाविकास आघाडीला चार, भाजपाला एक आणि अपक्ष एका जागेवर निवडूण आले. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने त्यांना विजय मिळाला आणि हे स्वाभाविक होते. माझे त्यांना नेहमी आव्हान राहील की त्यांनी एकटे लढून दाखवा. मात्र ते एकटे लढणार नाहीत, त्यांच्यात तेवढी हिंमत नाही.
या निवडणुकीत फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीचा झाला, शिवसेनेला भोपळा मिळाला. मित्रपक्ष सोबत नव्हता हे खरे आहे. पण मित्राला सोबत राहायचे नसेल तर त्याला आपण काय करणार. कितीही अंतर्गत कुरघोड्या केल्या तरी मित्रपक्ष सोबत असला तर फायदाच होतो. आता आम्ही चिंतन, मनन, परिक्षण, कार्यवाही सगळे करु. आता आम्हालाच ताकद वाढवावी लागणार आहे.
शिवसेनेने आत्मचिंतन करावे : देवेंद्र फडणवीस
ज्या पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या पक्षाला एकाही जागी विजय मिळवता आलेला नाही. आम्ही तरी एका जागी विजय मिळवला आहे. त्यामुळे आम्ही याबाबत आत्मचिंतन करुच मात्र ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीही आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली. मराठवाडा पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगांवकर, नागपूर पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाले.

Check Also

भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी

मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *