Breaking News

रेल्वेचा अजब कारभार : निवड झालेल्या राज्यातील ५६५ जणांना नोकरीवरच घेईना १ डिसेंबर रोजी सीएसएमटीला आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करत नोकर भरतीच्या जाहिरातीही प्रकाशित केल्या. मात्र या प्रक्रियेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास ५६५ उमेदवारांना वर्ष होत आले तरी अद्याप नोकरीवर रूजूच करून घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून लवकरात लवकर रूजू करून न घेतल्यास सीएसएमटीसमोर १ डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा या उमेदवारांनी दिला.

साधारणत: २०१८ मध्ये असिस्टंट लोको पायलट पदे भरण्यासाठी मध्य रेल्वेने जाहिरात प्रकाशित केली. या जाहिरातीनुसार लाखो विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज भरले. त्यातील ५६५ जणांची मध्य रेल्वेने निवड केली. निवड केल्यानंतर मध्य रेल्वेने या उमेदवारांना नोकरीवर रूजू करून घेत प्रशिक्षणासाठी पाठण्यात येणार असल्याचे जुलै २०१९ मध्ये कळविले. त्यानंतर पुन्हा त्यात बदल करत डिसेंबर २०१९ मध्ये रूजू करून घेणार असल्याचे कळविले. मात्र त्यानंतर अचानक फेब्रुवारी २०२० मध्ये रूजू होण्यासाठी दिलेले विभाग रद्द करण्यात आले. तसेच पुढील कोणतीही सूचना दिली नसल्याचे या ५६५ उमेदवारांपैकी एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Cat-1 (Electrical) आणि Cat-2 (Mechanical) च्या एकूण ४९९ ALP उमेदवारांसाठी पहिले पॅनेल जुलै 2019 मध्ये मध्य रेल्वेच्या (Central Railway) कार्मिक विभागाने (Personal Department) प्रकाशित केले आणि ते जॉईन झाले. त्यानंतर Cat-1 आणि Cat-2 च्या एकूण ९७३ उमेदवारांचे दुसरे पॅनेल एकत्रित  प्रभाग (Division) वाटपासह ९ डिसेंबर २०१९ रोजी प्रकाशित केले गेले. पण लवकरच १४ रोजी फेब्रुवारी २०२० मध्ये कोणतेही कारण न देता ५६५ उमेदवारांचे प्रभाग वाटप रद्द करण्यात आले आणि ९७३ पैकी फक्त ४०८ उमेदवारांना विभाग नियुक्त केले गेले. उर्वरित दुसऱ्या पॅनेलचे ५६५ उमेदवाराना १० जून २०२० रोजी विभाग (Division) वाटप करण्यात आले होते, पण जॉईन होण्यासंदर्भात कोणतीही सकारात्मक प्रक्रिया झालेली नाही. त्यानंतर आम्ही संयमाने जॉईन होण्याची वाट पाहत होतो. पण योग्य प्रतिसाद ZRTI तसेच सेंट्रल रेल्वे मुख्यालय विभागाकडून मिळत नव्हता.  ऑक्टोबर महिन्यात प्रशिक्षण वेळापत्रक प्रकाशित केले गेले होते ज्यात एप्रिल २०२१ पर्यंत  सर्व सेंट्रल रेल्वे च्या उमेदवारांना Joining देणार होते. पण पुन्हा प्रशिक्षण वेळापत्रक ZRTI भुसावळ यांनी केले कोणतेही कारण न देता बदलले. नवीन वेळापत्रकानुसार मध्य रेल्वेचे सर्व उमेदवारांचे Joining ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे आणि हे वेळापत्रक देखील निश्चित आहे याची शाश्वती देखील नाही तसेच ते पुन्हा बदलू शकते अशी भीती अन्य एका उमेदवाराने व्यक्त केली.

आम्ही ५६५ ALP  आरआरबी मुंबईमार्फत मध्य रेल्वेचे (Central Railway) उमेदवार म्हणून निवडले गेलेलो आहोत. एका वर्षा पासून आम्ही आमच्या Joining ची वाट बघत आहोत, पण प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन सेंट्रल रेल्वे आम्हाला जॉईन करून घेत नाही. सध्या महाराष्ट्र शासनाच्या गाईड लाइन प्रमाणे शाळा, कॉलेज ५०% क्षमतेने सुरू असून देखील झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ZRTI) भुसावळ त्याच्या क्षमतेच्या २०% क्षमतेने देखील सुरू नाही. नवीन वेळापत्रक नुसार ऑगस्ट २०२१ मध्ये जॉईन करून घेणार असे सांगितले. काही विद्यार्थ्यांना फेब्रुवारी २०२० मध्येच कॉल लेटर आले होते. त्यामुळे त्यांनी करत असलेला खाजगी जॉब देखील सोडला. म्हणून खूप कोठे आर्थिक नुकसान देखील होत असून आणि वेळोवेळी आमचे वेळापत्रक बदलून आम्हाला मानसिक त्रास देखील सेंट्रल रेल्वे मार्फत होत आहे. त्यामुळे आम्ही १ डिसेंबर २०२० रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेंट्रल रेल्वेच्या हेड ऑफिस समोर निषेध आंदोलन करणार असल्याचे या उमेदवारांनी सांगितले.

मागण्या –

1) ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सर्व ५६५ ALP  उमेदवारांना त्वरित रूजू करून घ्यावे.  प्रि-जॉईनिंगची समान प्रक्रिया इतर झोन (भोपाळ विभाग, अलाहाबाद विभाग) ने देखील केलेली आहे.

2) सेंट्रल रेल्वे मुख्यालयाने प्रकाशित केलेल्या जुन्या वेळापत्रका नुसार सर्वांचे प्रशिक्षण एप्रिल २०२१ सुरू करावे. आणि नवीन प्रशिक्षण वेळापत्रक रद्द करावे.

  1. महाराष्ट्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्था ५०% क्षमतेसह सुरू कराव्यात.
  2. जर ZRTI भुसावळ आमची ट्रेनिंग करण्यास असक्षम आहे तर आम्हाला देशातील कोणत्याही रेल्वे प्रशिक्षण केंद्रात पाठवून प्रशिक्षण द्यावे.
  1. कोविड-१९ मुळे वेस्टर्न रेल्वे ने जसे ऑनलाईन ट्रेनिंग दिली त्याच पद्धतीने सेंट्रल रेल्वे ने देखील सर्व उमेदवारांना ऑनलाईन ट्रेनिंग द्यावी.

Check Also

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: परिक्षा नाही- मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस राज्यातील कोविड बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आता लहान मुलांनाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *