Breaking News

मध्य रेल्वेने ३.३७ कोटी खर्च तर केले पण अहवाल महत्वाचा एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षेवरील खर्चावरील अहवालाची प्रतिक्षा

मुंबईः प्रतिनिधी
मध्य रेल्वे प्रतिवर्षी पावसाळयापूर्वी आणि नंतर एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट करत असून यावर्षीही आयआयटी मुंबईकडून करण्यात आलेल्या ऑडिटनंतर सुरक्षा अहवालाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य रेल्वे प्रशासनाने एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटवर रुपये ३.३७ कोटी खर्च केले.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे मध्य रेल्वे मुंबई विभागातील एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटची माहिती मागितली होती. मध्य रेल्वेच्या पूल विभागाने दिलेल्या माहितीत एफओबी आणि आरओबीची सामान्य सुरक्षा ऑडिट बाह्य एजन्सीला दिली जात नाही. विविध अभियंताच्या निश्चित केलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून मध्य रेल्वे प्रतिवर्षी पावसाळयापूर्वी आणि नंतर एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट करत असते. तसेच मोठ्या सुचनेवर काम होते. ऑगस्ट २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत १९१ एफओबी आणि ८९ आरओबीचे सुरक्षा ऑडिट आयआयटी मुंबईतर्फे केले गेले असून सुरक्षा अहवालाच्या प्रतिक्षेत आहे. एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटवर ३ कोटी ३७ लाख ८०० रुपये शुल्क निश्चित केले असून ५० टक्के म्हणजे १ कोटी ६८ लाख ५० हजार ४०० रुपये अँडव्हान्स देण्यात आले आहे. अद्यापही सुरक्षा अहवाल त्यांच्या कार्यालयात प्राप्त झाला नाही.
एफओबी आणि आरओबीची संख्या २८० असून आयआयटी मुंबईने टप्याटप्याने सुरक्षा अहवाल देणे अत्यावश्यक आहे. तसेच सामान्य प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून आवश्यक सुरक्षा ऑडिटवर पैसे खर्च तर होतात. पण सुरक्षा अहवाल वेळेत प्राप्त होत नाही. सुरक्षा अहवाल हे ऑनलाइन करत सार्वजनिक करण्याचे मत माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली यांनी व्यक्त करत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांस लिहिलेल्या पत्रात तशी मागणीही केली.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *