नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली.
देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण बोलत होते.
राज्यातील पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगांव आणि अकोला जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत भूषण यांनी चिंता व्यक्त केली. तसेच देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण याच नऊ जिल्ह्यात वाढत असल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
