Breaking News

संदीप सिंह-भाजप-ड्रग डील कनेक्शनची माहिती सीबीआयला देणार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना गृहमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

संदीप सिंह -भाजप-ड्रग डील कनेक्शनची सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन केली.

भारतीय जनता पक्षाचे हात सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग कनेक्शनमध्ये गुंतलेले आहेत. ड्रग डीलसंदर्भात ज्याच्यावर आरोप आहेत त्या संदीप सिंहने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर भाजपच्या मोठ्या नेत्याची भेट घेतली का ? या भेटीमध्ये काय चर्चा झाली यावर प्रकाश पडण्याची गरज आहे. संदीप सिंह भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन करून कोणाशी बोलला? त्याला भाजपच्या कोणत्या नेत्याचे संरक्षण आहे. नरेंद्र मोदींचा बायोपिक काढणे आणि गुजरात सरकारने संदीप सिंहच्या कंपनीसोबत १७७ कोटी रूपयांचा सामंजस्य करार करणे हा देवाण घेवाणीचा भाग होता. संदीप सिंह बालकांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मॉरीशसमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये संरक्षण देण्याचे काम मोदी सरकारने केले का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून मिळालेल्या सर्व तथ्यांचा अभ्यास करून सीबीआयकडे चौकशीसाठी सुपुर्द करण्यात येतील असे आश्वासन दिले. काँग्रेस पक्षाने भाजप व सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग कनेक्शन हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हणाले.

एम. के. आनंद यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करावी

टाईम्स न्यूज नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एम. के. आनंद यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपाची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी सचिन सावंत यांनी याप्रसंगी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनात सावंत यांनी नमूद केले आहे की, आनंद यांच्या कंपनीतील एका महिला कर्मचा-याने त्यांच्या विरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु कंपनीने तिच्या गंभीर तक्रारीची दखल घेण्याऐवजी आनंद यांना पाठीशी घालण्याची भूमिका स्वीकारल्याचे दिसून येते.  ह्या प्रकरणाची ‘विशाखा’ मार्गदर्शक निर्देशांप्रमाणे चौकशी झाली नाही. टाईम्स न्यूज नेटवर्कने सदर महिलेचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. परंतु या महिलेबाबत कंपनीकडून पक्षपाती भूमिका घेण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे सदर महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याची गरज सावंत यांनी विषद केली. यावेळी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शाह, युवक काँग्रेसचे प्रवक्ते आनंद सिंह, युवक काँग्रेसच्या सरचिटणीस  अॅड. करिना झेवियर उपस्थित होत्या.

Check Also

अखेर नारायण राणे यांना भाजपाने केली उमेदवारी जाहिर

राज्यातील लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात सर्वच राजकिय पक्षांकडून आस्ते कदम टाकण्यात येत आहे. भाजपाकडून तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *