Breaking News

Uncategorized

गडकरींचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले विकासासाठी नॅरोगेज ऐवजी ब्रॉडगेज असावा परस्पर सहकार्यातून राज्यातील रस्ते व लोहमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करु या

नागपूर : प्रतिनिधी राज्यात युतीची सत्ता असताना शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना बोलावून सांगितले की मुंबई, पुणे ही दोन शहरे सरळ रेषेत जोडली गेली पाहिजेत. जेणेकरून कमी वेळेत जाता आणि येता येईल. ते बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न नितीनजींनी सत्यात उतरविले. त्यांचे काम नेहमीच दैदिप्यमान असते असे कौतुकोद्गार काढत …

Read More »

कंपन्यांच्यांमदतीने आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दहा जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून याकरीता राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण …

Read More »

जगणे महाग करणाऱ्या जुलमी मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा १० दिवस आंदोलनाचा धडाका

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून गुरुवार ८ जुलैपासून दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या …

Read More »

जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई तर सुरुवात: अमित शाहकडे दाद मागणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

पुणे : प्रतिनिधी जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही तर सुरुवात आहे, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किंमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सुतगिरण्यांची चौकशी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिला. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून ते जप्त …

Read More »

दबावतंत्रापुढे मविआ सरकार झुकणार नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी तपास यंत्रणांना हाताशी धरून मविआ सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजपा सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून राज्यातील मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही त्यांना केंद्रीय तपास …

Read More »

महाविकास आघाडीसरकारवर भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील आणि फडणवीसांची टीका महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आरक्षण रद्द

पुणे-नागपूर: प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडी सरकारला पूर्ण अपयश आले असून आघाडी सरकारमुळे मराठा समाजाने शिक्षण व नोकरीतील आरक्षण गमावले आहे. यामुळे मराठा तरूण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, अशी …

Read More »

महाराष्ट्रासाठी रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या. वाढत्या …

Read More »

निवृत्त न्यायाधीश चांदीवाल समिती करणार गृहमंत्र्यांवरील आरोपाची चौकशी सहा महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणार

मुंबई : प्रतिनिधी मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटीची खंडणी वसुलीचा खळब‌ळजनक आरोप केला. आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय समितीची …

Read More »

सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीचे चित्रण जनतेसाठी उपलब्ध ५० वर्षांपूर्वीचा माहितीपट माहिती व जनसंपर्कच्या युट्यूब वाहिनीवर

मुंबई : प्रतिनिधी साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९० मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी …

Read More »

चित्रपट आणि मनोरंजनास उद्योगाचा दर्जा देणारा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचे जाळे विस्तारत असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यास मदत होते. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात सांस्कृतिक …

Read More »