Breaking News

विशेष बातमी

केंद्राने सांगितले, कोळसा हवाय तर परदेशातून मागवा २२ लाख मेट्रीक टन कोळसा आयात करण्यास दिली परवानगी

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपू्र्ण देशभरात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र देशात स्वत:च्या मालकीच्या कोळसा खाणी असताना केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात कोळसा हवाय तर परदेशातून मागवा असा सल्लाच महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांना दिला असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यासंदर्भातील केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने महाविकास आघाडी सरकारला पाठविलेले पत्र मराठी …

Read More »

पंतप्रधानांसमोरच मुख्य न्यायाधीश रमण म्हणाले, निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही तर पंतप्रधान म्हणाले, न्यायालयीन कामकाजात स्थानिक भाषा वापरायला हवी

न्यायालयाच्या निर्णयांची सरकार वर्षानुवर्षे अंमलबजावणी करत नाही. न्यायालयीन निर्णय असूनही जाणीवपूर्वक निष्क्रियता दाखवली जाते जी देशासाठी चांगली नाही. पॉलिसी मेकिंग हे आमचे अधिकार क्षेत्र नसले तरी एखादा नागरिक तक्रार घेऊन आमच्याकडे आला तर न्यायालय नाकारू शकत नाही. याचबरोबर, जनहित याचिकांच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण म्हणाले, …

Read More »

आरक्षित गटातील उमेदवारास जास्त मार्क असतील तर त्यास खुल्या वर्गातून नोकरी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नोकर भरतीत मागासवर्गातील आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा जास्त मार्क मिळविले असतील तर त्या उमेदवाराची निवड ही आरक्षित कोट्यातून करण्याऐवजी ती खुल्या प्रवर्गातून करावी आणि ज्या खुल्या वर्गातील उमेदवारांना जर नोकरीवर ठेवण्यात आले असेल तर त्यास काढून टाकू नये असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. भारत संचार निगम …

Read More »

एमटीडीसीच्या निसर्गरम्य पर्यटक निवासांमध्ये ‘डेस्टिनेशन वेडींग’चीही पर्वणी पर्यटकांना निखळ आनंदाबरोबरच देणार सोयी-सवलती

आगामी मे महिन्याच्या सुट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आखणी करीत असून पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रमांबरोबरच विविध सोयी- सवलती देण्यात येणार आहेत. ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे, डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निवासांमध्ये डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शूट, रिसेप्शन ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोविड …

Read More »

आणि शरद पवारांनी सांगितला खातं बदलून घेण्याचा किस्सा अजित पवारांना झोप काही लागणार नाही

विक्रम काळेंनी मला फोन करुन सांगितलं की आम्हाला १५ मिनिटं द्या. आम्हाला जी पुस्तकं वाटायची आहेत त्या कार्यक्रमाची सुरुवात करुन फक्त जा. मी घड्याळ बघतोय. विक्रम काळे हे शिक्षकांचे प्रतिनिधीचं गणित इतकं कच्चं असेल याचं उदाहरण आता पाहायला मिळालं. १५ मिनिटं झाली आणि आपण जवळपास एक तासावर आलाय असा मिश्किल …

Read More »

कोळशाच्या नावाखाली केंद्राचा राज्य सरकारला ६ हजार कोटींचा चुना राज्य सरकारने पाठविले केंद्राला पत्र

ऐन कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कोळसा कंपन्यांनी राज्य सरकारच्या मालकीच्या असलेल्या वीज निर्मिती केंद्राना कोळशाचा पुरवठा केला. मात्र कोळशाच्या नावाखाली कोळसा कंपन्यांनी दगड, कमी दर्जाचा कोळसा, निश्चित मेट्रीक टनापेक्षा कमी कोळसा, तपासणी न केलेल्या कोळसा आदी माध्यमातून राज्याच्या ऊर्जा विभागाला ६ हजार कोटी रूपयाहून अधिक किंमतीला चुना लावल्याची …

Read More »

ब्राह्मणांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची टीका

ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले. तर महाराजांचे शत्रू मुसलमान असल्याचा भास निर्माण करताना अफजलखानाच्या वधाचे उदाहरण दिले, पण अफजलखानाचा वध महाराजांनी स्वराज्याचे शत्रु म्हणून केला, हे या विद्वानांना ठाऊक नाही असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी …

Read More »

देशाचे नवे लष्करप्रमुख मनोज पांडे ३० एप्रिलला स्विकारणार सुत्रे

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचे नाव देशाच्या नव्या लष्कर प्रमुख पदी निश्चित करण्यात आलं आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे येत्या ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत. नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात मनोज पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या श्रेणीत मनोज पांडे हे …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षणासंबधी केंद्राचे राज्याला पत्रः बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे भरा आता खुल्या वर्गाबरोबर आरक्षित प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बढती देण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयात पदोन्नतीतील आरक्षणाविषयीच्या याचिकेवरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यामुळे जरी फक्त खुल्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सध्या पदोन्नती मिळत असली तरी आता आरक्षित वर्गातील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संभावित अधीन राहुन पदोन्नती देण्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच केंद्राच्या कार्मिक मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठविल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. पदोन्नतीतील …

Read More »

शिवसेनेमुळे राज ठाकरे यांनी स्विकारली “ती” भूमिका? महाविकास आघाडीत दाखल झाल्याने मनसे भाजपाच्या जवळ

काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हयातीत असतानाच शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण? या प्रमुख मुद्यावरून राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी शिवसेनेतील राज समर्थक जे नेते होते ते ही बाहेर पडले. त्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करत महाराष्ट्राची ब्ल्यु प्रिंट तयार करून ती महाराष्ट्रासमोर सादर केली.या ब्ल्यु प्रिंटचे …

Read More »