Breaking News

विशेष बातमी

सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री पुन्हा असामान्य ? सीएमओत जाण्यासाठी मंत्रालयाची वेळ

साधारणत: तीन महिन्यापूर्वी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहेत असे सांगत कोणीतीही अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या अडी-अडचणी ऐकून घेत आणि त्यावर तात्काळ फोन करून पुढील आदेश देत असत. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकाने नियुक्ती पत्र दिले मविआ काळात निवड झालेल्या उमेदवारांना

हिमाचल प्रदेश पाठोपाठ गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा आज जाहीर झाल्या. मात्र या दोन राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी रोजगार मेळावा घेत देशभरातील अनेक आधीच निवड झालेल्या बेरोजगार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. अगदी त्याच पार्श्वभूमीवर राज्यातही शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

न्यायालयाचा निकाल, पोलिस स्टेशन मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे म्हणजे गुन्हा नाही

एका वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांकडून मध्यस्थी करत दोन्ही तक्रारदारांमध्ये साम्यंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु यापैकी एकाने सदर चर्चेचे मोबाईलमधील कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डिंग केले. त्यामुळे पोलिसांकडून सदर व्यक्तीच्या विरोधात आयपीसी ३ आणि ४ ऑफिसिएल सिक्रेट अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने …

Read More »

न्यायालयाचा निर्णयः पत्नीला घरातील कामे करायला सांगणे म्हणजे क्रुरपणा नव्हे

जर विवाहीत स्त्रीला अर्थात पत्नीला कुटुंबियासाठी घरातील कामे करायला सांगितले तर तो क्रुरपणा नव्हे तसेच काम सांगण्या मागचा उद्देश हा घरकाम करणाऱ्या मोलकरणीशी होऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमुर्ती विभा कांकणवाडी आणि राजेश एस.पाटील या द्विसदस्यीय खंडपीठाने सारंग दिवाकर आमले विरूध्द …

Read More »

अखेर ब्रिटनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डट यांच्या माघारीनंतर सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर यावर आलेल्या लिस ट्रॉस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अर्थमंत्र्यांनी जाहिर केलेल्या अर्थनीतीमुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला होता. त्यामुळे लिझ ट्रॉस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढील पंतप्रधान कोण? अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पेनी …

Read More »

चित्तथरारक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजय टी २०त भारताची दमदार सुरुवात

टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब …

Read More »

युनोचे सरचिटणीस म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदीचा मसुदा महात्मा गांधींच्या प्रेरणेतून

आज भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारताने गेल्या ७५ वर्षांत शांतता, स्थैर्य, सुरक्षा आणि सर्वसमावेशकता निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्र -भारत परस्पर भागीदारी, दक्षिण – दक्षिण सहकार्य वृध्दिंगत करणे या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस …

Read More »

हिजाब बंदीः न्यायाधीशांचा विभागून निकाल, प्रकरण मोठ्या पीठाकडे एक न्यायाधीश म्हणतात याचिकेवर सुनावणी घेण्याची गरज नाही तर दुसरे म्हणतात मुलींचे शिक्षण महत्वाचे

शाळा, काँलेजमध्ये मुलींनी हिजाब घालू नये असा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला. सरकारचा हा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने कायम ठेवला. या निर्णयाच्या विरोधात तेथील मुलींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने एकमेकांच्या विरोधात निर्णय दिला. त्यामुळे हिजाब बंदी याचिकेवरील सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे …

Read More »

तहसीलदाराने उघडकीस आणले जमिन हडप करण्याचा प्रकार, मंत्र्याकडून मात्र दबाव

मागील काही वर्षात कोकणात अनेकविध प्रकल्प येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात जमिनीला सध्या सोन्याचा भाव आलेला आहे. त्यामुळे मिळेल त्या जमिनी थेट गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. तर काही जणांकडून जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून जमिन लाटण्याचे प्रकारही सध्या सुरु झाले आहे. अशीच एक २१० एकर जमिन हडपण्याचा …

Read More »

गायीवरून सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, अशा याचिका दाखल का करता? याचिका कर्त्याला फटकारले न्यायालयाने

गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेमध्ये गायींचं संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली होती. न्यायमूर्ती एस. एस. कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. याचिकाकार्त्यांच्या वकिलांनी भारत सरकारसाठी गायींची सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय असल्याचा …

Read More »