Breaking News

विशेष बातमी

राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा …

Read More »

८ महिन्यानंतर राज्य सरकारने दिला विकासासाठी निधी, आमदार फंडही झाला उपलब्ध आमदार फंड आणि जिल्हा नियोजन मंडळासाठी निधीचे वाटप

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या कामात निधीची कमतरता भासू नये या उद्देशाने राज्य सरकारकडून सर्वच खर्चावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता ८ महिन्यानंतर रखडलेली विकास कामे आणि नव्या विकास कामांसाठीबरोबर नाराज आमदारांना खुष करण्यासाठी नुकतेच राज्याच्या वित्त विभागाने निधीचे वाटप केले असून त्यासाठी तब्बल २५ हजार कोटी …

Read More »

रेल्वेचा अजब कारभार : निवड झालेल्या राज्यातील ५६५ जणांना नोकरीवरच घेईना १ डिसेंबर रोजी सीएसएमटीला आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करत नोकर भरतीच्या जाहिरातीही प्रकाशित केल्या. मात्र या प्रक्रियेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास ५६५ उमेदवारांना वर्ष होत आले तरी अद्याप नोकरीवर रूजूच करून घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून लवकरात लवकर …

Read More »

मंत्रालयातील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती मिळणे होणार बंद सामान्य प्रशासन विभाग बनवतंय नवे धोरण

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनात “मलाईदार प्रतिनियुक्ती” वर असलेल्या पदांची अनेकांना भुरळ पडली आहे. त्यात महसूल विभाग अग्रेसर असला तरी इतर विभागातही त्याची थोड्या फार प्रमाणात लागण झालेली आहे. त्यामुळे विशेषत: मंत्रालयीन केडरच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या बाहेरील पदांवर प्रतिनियुक्तीवर जाणे आता बंद करण्यात येणार असून त्याविषयीचे नवे धोरण सामान्य प्रशासन …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा महा आघाडी सरकार नव्हे तर उच्च न्यायालयावर ठपका अर्णव गोस्वामी प्रकरणी भाजपाचा दावा निघाला खोटारडा

मुंबई : प्रतिनिधी अन्वय नाईकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक तथा वृत्तनिवेदक अर्णव गोस्वामी यांच्यासह तीन जणांना ५० हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करत तपासप्रक्रियेत कोणतीही दखल द्यायची नाही असे निर्देश दिले. विशेष म्हणजे हा निकाल देताना राज्य सरकारने अर्थात अलिबाग पोलिसांनी केलेल्या कारवाईवर कोणतेही प्रश्नचिन्ह उभे न करता नाईकप्रकरणी …

Read More »

पुणे वगळता महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व न्यायालये सुरु मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज सुरुवातीला थांबविण्यात आले. मात्र अनलॉक प्रक्रियेमध्ये ऑनलाईन सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली. मात्र आता १०० टक्के क्षमतेसह दोन टप्प्यात पुणे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ डिसेंबर २०२० रोजीपासून न्यायालयीन कामकाज सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एस.जी दिघे यांनी …

Read More »

वेश्याव्यवसायातील ३० हजार महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान दरमहा ५ हजारांची तर मुले असणाऱ्यांना २,५०० चे अतिरिक्त मदत

मुंबई : प्रतिनिधी वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य अदा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार वेश्या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा ५ हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त २ हजार ५०० रुपये अर्थसहाय्य कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह …

Read More »

केंद्राचे राज्यांना आदेश, निर्बंध पुन्हा लावण्याची वेळ.. घरोघरी जावून टेस्ट करा केंद्र सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबईः विशेष प्रतिनिधी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात पुन्हा एकदा देशात रात्रीची संचार बंदी, नागरीकांच्या एकत्र येणाच्या संख्येवर पुन्हा मर्यादा यासह अन्य कडक निर्बंध लागू करण्याची गरज असल्याचे मत केंद्र सरकारने व्यक्त करत घरोघरी जावून कोरोनाच्या तपासण्या करण्याचे आदेश सर्व राज्य सरकारांना आज …

Read More »

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय तुर्तास ईडब्लूएसचा दर्जा देण्यास होकार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ईडब्ल्युएसचे प्रमाणपत्र सादर केल्याने सदर मराठा समाजातील व्यक्तीला ईडब्ल्युएस अंतर्गत असलेले फायदे देण्याचा महत्वपूर्ण निकाल देत पुढील सुणावनी १ डिसेंबर रोजी घेणार असल्याचे स्पष्ट केले. बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील एका ज्ञानेश्वर पिराजी …

Read More »

महाराष्ट्रात लव्ह जिहाद? भाजपाला पडला आपल्याच नेत्याच्या भाचीच्या लग्नाचा विसर कायद्याच्या मुळ चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न

मुंबई : विशेष प्रतिनिधी देशातील भाजपा शासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची घोषणा केल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रातही हा कायदा आणण्याची मागणी भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्यासह करत अन्य नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र या नेत्यांनी लव्ह जिहाद कायद्याची मागणी करताना भाजपामधील एका बड्या  नेत्याच्या भाचीने मुस्लिम …

Read More »