Breaking News

सामाजिक

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, राज्यघटनेतील प्रस्तावनेची दुरूस्तीपूर्वी….?

राज्यघटनेतील प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द काढून टाकण्याची मागणी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश दिपंकर दत्ता आणि संजीव खन्ना यांनी सवाल करत राज्यघटनेतील प्रस्तावनेची अंमलबजावणी दुरूस्ती करण्यापूर्वी कधी अंमलबजावणी केली आहे का असा सवाल केला. स्वतंत्र भारताची राज्यघटना …

Read More »

सामाजिक न्याय विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना

राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व,अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे. तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार …

Read More »

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे नाटक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले

राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाट्य विभाग अर्थात ललित कला केंद्राकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही विभागप्रमुख डॉ प्रविण भोळे यांच्या परवानगीने रामायणातील आधारीत नाट्य सादर करण्यात येत होते. मात्र रामायणातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद आणि दृष्य दाखविल्याच्या निषेधार्थ अभाविप अर्थात अखिल भारतीय …

Read More »

वाराणसी न्यायालयाचा निर्णयः ग्यानवापी मस्जिदीतील तळघरात हिंदू पुजेला परवानगी

जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ग्यानवापी मस्जिदीच्या जागी पूर्वी हिंदू देवस्थान होते या मागणीवरून सध्या न्यायालयीन लढाईत काही हिंदू देवस्थानची बाजू सक्षम ठरत आहे. त्यातच भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या सर्व्हेक्षणात मस्जिदीच्या तळघरात पूर्वी हिंदू धर्मियांचे मंदिर असल्याचे पुरावे पुढे आल्याने या तळघरात हिंदू पध्दतीने पुजा-अर्चा करण्याची …

Read More »

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडिची आर्थिक मदत देण्यात येत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी …

Read More »

महात्मा बसवेश्वर महामंडळासह संत काशिबा गुरव महामंडळ कार्यान्वित

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाले आहे. या महामडळांमार्फत राज्यातील गुरव व लिंगायत समाजातील घटकांसाठी व्यापार, उद्योग, शेतीपूरक व्यवसाय तसेच व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत. या महामंडळाच्या योजनांचा …

Read More »

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. भारत जोडो अभियानातर्फे आयोजित जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दाराआड झालेल्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी ही माहिती दिली. १४ जानेवारी रोजी मणिपूर येथून निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्यासाठी ते त्यांना आमंत्रित करत होते. प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नांना …

Read More »

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या कुटुंबियातील सदस्यांनाही ठार मारले. त्यानंतर या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या देकरेखीखाली महाराष्ट्रात झाली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने यातील काही आरोपींना जन्मठेपेची तर काही जणांना फाशीची शिक्षा सुणावली. तरीही मागील वर्षीच्या १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य …

Read More »

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविते. ८२ पैकी २० वसतिगृहे सुरु असून उर्वरित ६२ वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या ४१ …

Read More »

कृष्ण जन्मभूमीविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मागील काही महिन्यांपासून हिंदूत्ववादी संघटनांकडून विशिष्ट समुदायाच्या विरोधात वातावरण निर्मिती करत त्यांच्या धार्मिक प्रार्थनेच्या जागेतही हस्तक्षेप करत एकप्रकारची भीती निर्माण करत आहेत. याच अनुषंगाने उत्तर प्रदेशातील मथुरेतील शाही इदगाह मस्जिदीच्या खाली कृष्ण जन्मभूमी असल्याचा दावा करत अयोध्येतील बाबरी मस्जिदी प्रमाणे शाही इदगाह मस्जिद पाडण्याविषयीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. …

Read More »