Breaking News

सामाजिक

गुजरात विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण

अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विविध परदेशातील विद्यार्थ्यांवर वसतिगृहाच्या कॅम्पसमध्ये नमाज अदा करण्याच्या मुद्द्यावरून एका गटाने कथितपणे हल्ला केला, असे पोलिसांनी १७ मार्च रोजी सांगितले. १६ मार्चच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर काही जखमी विद्यार्थ्यांना अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही वर्षात परदेशातील विद्यार्थी भारतातील विविध राज्यात शिक्षणाच्या …

Read More »

राज्य व विभागीय स्तरावर हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

अवैध दारू निर्मिती व विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढविण्यात यावा, यासाठी हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात यावी. या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करून शासनाच्या मान्यतेस सादर करावा, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. राज्य उत्पादन शुल्क भवन येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत …

Read More »

सामाजिक न्याय विभागाकडून एकदम चार वर्षाचे विविध पुरस्कार जाहिर

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक / व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा …

Read More »

एक वही एक पेन अभियानाचे जनक राजू झनके यांना समाजभूषण पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजू झनके यांना जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी १२ मार्च २०२४ रोजी सकाळी १०वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. विविध कारणास्तव मागील चार वर्षांपासून प्रलंबित …

Read More »

गंगा नदीत आंघोळीला निघालेल्यांचा ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडल्याने मृत्यू

कासगंज रस्त्याने गंगा नदीत आंघोंळ करण्यासाठी ३० ते ४० जणांना घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल जाऊन झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ ते २० जण जखमी झाले. मृतकांमध्ये ७ लहान मुलांसह ८ महिलांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरचा अपघात एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, राज्यघटनेतील प्रस्तावनेची दुरूस्तीपूर्वी….?

राज्यघटनेतील प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द काढून टाकण्याची मागणी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश दिपंकर दत्ता आणि संजीव खन्ना यांनी सवाल करत राज्यघटनेतील प्रस्तावनेची अंमलबजावणी दुरूस्ती करण्यापूर्वी कधी अंमलबजावणी केली आहे का असा सवाल केला. स्वतंत्र भारताची राज्यघटना …

Read More »

सामाजिक न्याय विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना

राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व,अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे. तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार …

Read More »

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे नाटक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले

राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाट्य विभाग अर्थात ललित कला केंद्राकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही विभागप्रमुख डॉ प्रविण भोळे यांच्या परवानगीने रामायणातील आधारीत नाट्य सादर करण्यात येत होते. मात्र रामायणातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद आणि दृष्य दाखविल्याच्या निषेधार्थ अभाविप अर्थात अखिल भारतीय …

Read More »

वाराणसी न्यायालयाचा निर्णयः ग्यानवापी मस्जिदीतील तळघरात हिंदू पुजेला परवानगी

जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ग्यानवापी मस्जिदीच्या जागी पूर्वी हिंदू देवस्थान होते या मागणीवरून सध्या न्यायालयीन लढाईत काही हिंदू देवस्थानची बाजू सक्षम ठरत आहे. त्यातच भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या सर्व्हेक्षणात मस्जिदीच्या तळघरात पूर्वी हिंदू धर्मियांचे मंदिर असल्याचे पुरावे पुढे आल्याने या तळघरात हिंदू पध्दतीने पुजा-अर्चा करण्याची …

Read More »

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडिची आर्थिक मदत देण्यात येत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी …

Read More »