Breaking News

मुंबई

उद्धव ठाकरे यांचा घणाघात, सरकार कोण तर एक फुल दोन हाफ… जालना येथील आंदोलकांवरील हल्ल्यावरून सोडले टीकास्त्र

इस्रोच्या शास्त्रज्ञांचे पुन्हा अभिनंदन, आता सूर्याचा अभ्यास सुरु झाला गेली सहा दशके ही संस्था काम करते आहे. त्याचा आपल्याला अभिमान. काल मिर्लेकरांनी एक मेसेज पाठवला पक्ष चोरला चिन्ह चोरले पण ठाकरेंनी मुंबईत इंडिया एकत्र करुन दाखवला. या तुमच्या शक्तीमुळेच आपल्याला हुकूमशाही विरोधी आघाडीत मानाचे स्थान. आम्ही व्यक्ती विरोधात नाही. आता …

Read More »

राज ठाकरे म्हणाले,… सरकारचं चुकलं मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीचार्ज आंदोलन

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर ट्विट करत आपली भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, ह्या घटनेवर मी …

Read More »

काँग्रेसची वॉर रुम भाजपाच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर देणार राहुल गांधींच्या हस्ते राजीव गांधी सोशल मीडिया सेंटरचे उद्घाटन

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे. भाजपा सोशल मीडीयाचा दुरुपयोग करत फेक न्यूजही ससरवत असतो. भाजपाचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी व भाजपाकडून होत असलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

पुण्यातील ‘आयुका’चा सहभाग अभिमानास्पद आदित्य एल-१ च्या यशस्वी उड्डाणानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

चंद्रयान-३ या यशस्वी मोहिमेतून भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. आता सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे पहिलेच सूर्ययान सूर्याच्या अभ्यासासाठी यशस्विरित्या प्रक्षेपण करून, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी, अशी कामगिरी केली आहे. या यशासाठी ‘इस्त्रो’ या आपल्या अवकाश संशोधन संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री …

Read More »

महेंद्रगिरी युध्दनौकेचे जलावरण ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे उपराष्ट्रपती डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण

माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले. ‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी स्टेल्थ विनाशिका आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या …

Read More »

मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईतील केवळ प्रमुख रस्तेच नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय.एस. चहल यांना दिले. मुंबईतील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. ही बाब मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभिर्याने घ्यावी, …

Read More »

‘मेरी माटी मेरा देश’ अभियान लोकसहभागातून यशस्वी करावं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेने या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कुलाबा येथील कार्यक्रमात या अभियानाचा राज्यव्यापी प्रारंभ करण्यात आला …

Read More »

इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री मार्लेश्वर देवस्थान आदी क्षेत्रांना ऐतिहासिक, अध्यात्मिक, पुरातत्वीय वारसा आहे. या क्षेत्रांचा विकास करताना पुरातत्वीय महत्व, ऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावे. नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, मुंबईचा अधिकार हिरावण्याचा केंद्राचा प्रयत्न हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून आंदोलन

मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीती आयोगावर सोपविली आहे. हे राज्यातील मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. केंद्र सरकार जे सांगते त्या पावलावरती पाऊल इथलं सरकार टाकत आहे. नीति आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार पंतप्रधान कार्यालयाच्या मार्फत मुंबई चालवणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी …

Read More »

दीपक केसरकर यांचा सवाल,…उद्धव ठाकरे हे राहुल गांधींकडून माफी वदवून घेणार का? किती नेते बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहणार? शिदे गटाचा उबाठा गटावर घणाघात…

ही मुंबई हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे आणि दुर्दैवाने याच शहरात त्यांचा मुलगा बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, त्यांच्यासमोरच लाचारी करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे माफी मागायला लावणार का ? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना ठाकरे …

Read More »