Breaking News

मुंबई

मुंबईतील भूखंड दत्तक तत्वावर देण्यास सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध शैलेश गांधी, अनिल गलगली यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक

मुंबई महापालिकेने काळजीवाहू, दत्तक तत्त्वावर दीर्घ मुदतीसाठी व दत्तक तत्त्वावर ११ महिन्यांसाठी भूखंड देण्यासाठी तयार केलेल्या मसुद्याबाबत रविवारी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांच्या सांताक्रूझ निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीत नवीन मसुद्याचा विरोध करत पालिकेने जमीन राखून ठेवत त्याची देखरेख करण्यावर सर्वानुमते ठरविण्यात आले आणि …

Read More »

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण : ‘एडलवाईज’च्या अधिकाऱ्यांना अटकेची धाकधूक कायम अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ‘एडलवाईज’च्या अधिकाऱ्यांना अटकेची धाकधूक कायम आहे. उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या तिन्ही आरोपींनी अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याबाबत गुरुवारी न्यायालयाला आग्रही विनंती केली. तथापि त्यांची ही विनंती मान्य करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आणि पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला निश्चित केली. त्यामुळे आरोपींवर अटकेची टांगती तलवार कायम …

Read More »

एस टी च्या कर्मचारी संघटना विरहित व मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रयत्नाने पदोन्नतीची चाके फिरणार मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली

महाराष्ट्र राज्याची लाल परी म्हणजे सर्वसामान्य माणसांची प्रवास वाहिनी आहे. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संघटना विरहित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत त्यांना निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.  एसटी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची चाके गतीने फिरणार असल्याचे संकेत मिळाले …

Read More »

चर्मकार समाजासाठीच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ

चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी २०२३-२४ या वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. राज्य शासनाच्या अनुदान योजना ५० हजार रुपये आणि …

Read More »

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवास’ करिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात येणार

जिल्हयातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी राहत असलेल्या शहरात सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी केंद्र शासनामार्फत सखी निवास ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत मुंबई उपनगर येथे सहा सखी निवास भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी केंद्र शासनाने निश्चीत केलेल्या संस्था तसेच एजन्सीज कडून १८ सप्टेंबर, …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातंय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेवर टीकास्त्र

आम्हाला फक्त समाजातच नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जात आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे . भाजपा-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत अशी टीका आंबेडकर यांनी आज ट्वीट करीत …

Read More »

इर्शाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती

मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होवून दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख रुपये व राज्य आपत्ती सहायता निधीतून ४ लाख रुपये असे प्रत्येकी ५ लाख …

Read More »

मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू; सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असून, त्या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका …

Read More »

कोरोना काळात महापालिकेच्या खिचडी वाटपात कोट्यवधींचा भ्रष्टाचार खा. संजय राऊत यांच्या नातलगांना झाला लाभ -भाजपा नेते माजी खा. डॉ. किरीट सोमैया यांचा आरोप

कोरोना काळात मुंबई महापालिकेने स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्यासाठी राबविलेल्या योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून खा. संजय राऊत यांची कन्या, भाऊ तसेच निकटवर्तीयांना या भ्रष्टाचारात लाखो रुपयांचा लाभ झाला आहे , असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खा. डॉ . किरीट सोमैया यांनी शुक्रवारी केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात …

Read More »

मुंबईच्या दहिहंडीत मान्सूनची हजेरी, उत्सवात ३५ जण जखमी बहुतांष मंडळाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी

मुंबईसह राज्यात कृष्णाजन्मष्टीचा आनंद आज दहिहंडीच्या रूपात जल्लोषात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी मागील काही महिन्यापासून गायब झालेल्या मान्सूनच्या पावसाने आज हजरी लावत गोविंदाच्या उत्साहात भर घातली. त्यामुळे गोविंदाच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मंडळांच्या दहिहंडी उत्सवात जवळपास ३५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. …

Read More »