Breaking News

मुंबई

शरद पवार ब्रीच कँण्डीत दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोट दुखीवर उपचार घेतल्यानंतर आज त्यांना आज रविवारी पुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. त्यांच्यावर उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या अगोदर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांची विश्रांती करण्याचा सल्ला दिला …

Read More »

देशमुखावरील आरोपांची सीबीआय करणार गुन्हा दाखल न करता प्राथमिक चौकशी परमबीर सिंगांना खालच्या न्यायालयात पाठवत अॅड. पाटील यांच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केलेल्या आरोपप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर परमबीर सिंग यांना सेशन न्यायालयात दाद मागण्याचे आदेश देत सीबीआयने गुन्हा अर्थात एफआयआर न नोंदविता १५ दिवसात प्राथमिक चौकशी करून त्याबाबतचा पुढील निर्णय घ्यावा असे स्पष्ट आदेश अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर मुंबई उच्च …

Read More »

निर्मल नगर रहिवाशांनी विकासकाला दिली १५ दिवसाची मुदत अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

मुंबईः प्रतिनिधी निर्मल नगर येथील पुर्नविकास प्रकल्पात विकासकाकडून मनमानी करण्यात येत आहे. मागील ३ वर्षापासून येथील १८०० रहिवाशांना विकासकाने भाडेही दिलेले नाही. पुढील १५ दिवसात विकासक सेजल सिध्दा बिल्डरने रहिवाशांचे थकित भाडे आणि पुर्नविकासाचे काम लवकर मार्गी न लावल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा ऑल्वीन युथ फाँऊडेशनचे संस्थापक ऑल्वीन दास …

Read More »

मुंबईत राहणार नाईट कर्फ्यू महानगरपालिकेकडून ट्विटद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात रात्रीची जमाव बंदी आदेश उद्यापासून रविवारपासून लागू होत आहे. मात्र मुंबईत आज ६ हजारहून अधिक रूग्ण आढळून आल्याने मुंबईतही जमावबंदीबरोबरच नाईट कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने ट्विटरवरून दिली. तसेच रात्रो ८ ते सकाळी ७ वाजेपर्यत सर्व मॉल बंद राहणार असून तशी कल्पना सदर आस्थापनांना …

Read More »

राज्य सरकारने मंजूरी देवूनही प्रधान सचिवांचा मात्र विरोध पुणे विद्यापीठास पाली भवन उभारण्यासाठी निधी देण्यास नकार

मुंबई: प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्य शासनाने विविध उपक्रम राबविले होते.त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाली भवन उभारण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतला होता. त्यानुसार सर्व कायदेशीर बाबी पुर्ण झाल्या असतानाही …

Read More »

गृहमंत्री देशमुखांच्या विरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करा सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आज धाव घेत मुंबई पोलिस आयुक्त पदावरून झालेली बदली रद्द करावी आणि गृहमंत्री देशमुख यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिस …

Read More »

गर्दीच्या ठिकाणी अॅंन्टीजेन चाचणी कराच ! अन्यथा कारवाईला सामोरे जा मुंबई महापालिकेकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसात मुंबई शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३ हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला थोपविण्यासाठी आता गर्दीच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची अँन्टीजेन कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देत चाचणीस नकार देणाऱ्या नागरीकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने सर्व वार्ड अधिकाऱ्यांना दिले. दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधितांच्या …

Read More »

या कारणासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची झाली बत्तीगुल २० मिनिटासाठी मंत्रालय राहिले वीजेविना

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्लॅकआऊटची घटना ताजी असताना आज मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची वीज तब्बल २० मिनीटसाठी खंडित झाली. त्यामुळे मंत्रालयात आलेल्या काही मंत्र्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना काळोखात राहण्याची वेळ आली. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक विभागांना आपली कामे करता आली नाहीत. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे वीज खंडीत झाल्याची माहिती मंत्रालयातील वीज …

Read More »

कोरोनाच्या काळात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेचा अट्टाहास का? शिधावाटप संघटना आक्रमक

मुंबईः प्रतिनिधी सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई / ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसऱ्याबाजूला मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून बोगस शिधा पत्रकधारकांना शोधण्यासाठी नव्याने नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले. परंतु केंद्र सरकारची वन नेशन वन कार्ड हे अभियान राबविले जात असताना आणि कोरोनाबाधितांची …

Read More »

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे तर परमबीर सिंग गृहरक्षक प्रमुख गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी अॅटालिया बंगल्याच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी आढळून आल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत देण्यात येत होते. अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक झाल्यानंतर मुंबईच्या …

Read More »