Breaking News

आरोग्य

कोरोनाबाधितांवरील उपचार, आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती सीसीटीव्ही बसविण्याचे आणि नातलगांना रुग्णांच्या चौकशीसाठी रुग्णालयात सोय करण्याचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय असून लक्षणांनुसार रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी देईल. यासंदर्भात आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. …

Read More »

कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण मुंबई-ठाण्यात ५० हजारावर तर राज्यात ८० हजाराच्या काठावर ३५१५ बरे होवून घरी तर ६३६४ नव्या रूग्णांचे निदान, १९८ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई-विरार आदी भागात सातत्याने रूग्ण संख्या वाढीस लागल्याने अखेर पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला. परंतु तरीही या भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून ठाणे शहर व ग्रामीण भागातील बाधीतांची एकूण संख्या ५६६३ आणि ११२१४ वर पोहोचली …

Read More »

कोरोना: आज महिन्यातील सर्वाधिक बरे होणारे, नवे रूग्ण आणि चाचण्यांचा टप्पा ६ हजार ३३० नवे सर्वाधिक रूग्ण तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी बाधितांची संख्यांही चांगलीच वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात ८ हजार १८ रूग्ण बरे होवून घरी गेले. तर आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण अर्थात ६ हजार ३३० रूग्णांचे निदान झाले. तर १२५ मृतकांची नोंद झाली असून घरी जाणाऱ्यांची संख्या १ …

Read More »

सुखद बातमी: २४ तासात ८ हजार रूग्ण घरी: कोरोनामुक्तांची संख्या लाखावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधीक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री …

Read More »

कोरोना: जूनमध्ये ५ हजार ६९१ मृत्यू , बरे होणाऱ्यांची संख्या ९३ हजारावर ५५३७ नने रूग्ण तर १९८ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे अखेरला २२८६ मृतकांची नोंद झाली होती. मात्र १ जून रोजी २३६२ मृतकांची नोंद झाली. १ जून ते १ जुलै या कालावधीत राज्यात एकूण ५ हजार ६९१ मृतकांची नोंद झालेली असून आतापर्यंत ८ हजार ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात २२४३ जणांना घरी सोडण्यात आल्याने …

Read More »

रुग्णवाहिकांकडून होणाऱ्या आर्थिक लूटीतून सामान्यांची होणार सुटका खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार: शासन निर्णय जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना …

Read More »

कोरोना: दोन महिन्यानंतर मुंबईतील संख्या हजाराच्या आत मात्र उपनगरात वाढच ४८७८ नवे रूग्ण तर २४५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने १२०० ते २८००च्या दरम्यान वाढीव रहात असे. मात्र आज पहिल्यांदाच मुंबई महानगर पालिका हद्दीत ८९३ इतक्या कमी प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. कालही शहरामध्ये १२४५ च्या जवळपास संख्या होती. परंतु उपनगरातील ठाणे जिल्हा ५५० हून अधिक, नवी मुंबई १९५, कल्याण डोंबिवली ४३५, …

Read More »

कोरोना: उपनगर, पुणे आणि औरंगाबादेत वाढ कायम, मात्र २२८५ जणांना घरी सोडले १८१ जणांचा मृत्यू तर ५२५७ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या कालच्याप्रमाणे आजही १२०० मध्ये नियंत्रणात आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर व जिल्ह्यात ५८०, नवी मुंबईत २३४, कल्याण डोंबिवलीत ५१३, उल्हासनगर १३७, भिवंडी-निझामपूर १३१, मीरा भांईदर १५०, वसई विरार २८७, रायगड १५३, पनवेल १५८ इतके रूग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत नक्कीच जास्त …

Read More »

प्लाझ्मा थेरपीचा शोध कोणी आणि कधी लावला माहित आहे का? १९ व्या शतकात लावला पण कशासाठी

कोरोनावर मात करण्यासाठी आणि बाधितांचे प्राण वाचविण्यासाठी महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. ही मोठी उपलब्धता असून आपण मध्यम आणि गंभीर रुग्णांवर जिथे केअर नसलेल्या ठिकाणी प्लाझ्मा मशीन मागवत आहोत. …

Read More »

जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य

मुंबई : प्रतिनिधी प्लाझ्मा देणारे जीवनदाते आहेत. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाउल पुढे टाकले आहे. एप्रिलमध्ये आपण प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे …

Read More »