Breaking News

आरोग्य

सर्वोच्च न्यायालयाचा मेडिकल निग्लिजन्सप्रकरणी डॉक्टरला दणका

एका ८४ वर्षिय व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रूग्णालयात दाखल केल्यानंतर नीटसे औषधोपचार केले नसल्याने दृष्टी गमाविण्याची वेळ आल्याचा आरोप डॉक्टरवर केला. ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना संबधित डॉक्टराला २ लाख रूपयांचा दंड ठोठावत सदरची नुकसान भरापाई डॉक्टराला देण्याचा निर्णय दिला. संबधित ८४ वर्षीय व्यक्तीने ग्राहक मंचकडे …

Read More »

प्रशिक्षित उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार

महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल यांनी प्रशिक्षीत उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरीता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. मंत्री लोढा म्हणाले, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण …

Read More »

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रूग्णालयातही होमिओपॅथिक विभाग सुरु

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मंत्रालयात होमिओपॅथिक महाविद्यालयांच्या विविध समस्या आणि राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ‘स्मार्ट पीएचसी’ चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविणार

राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा …

Read More »

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी …

Read More »

Corona जे एन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा

राज्यात कोरोनाच्या Corona ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले आहे. Corona ‘जेएन-१’ साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक …

Read More »

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश दिले. नागरिकांनी घाबरून …

Read More »

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘ईएसआयसी’च्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी …

Read More »

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत दूर्गम भागात आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. या समितीकडून एक महिन्यात अहवाल मागवला जाईल, अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य …

Read More »

आता शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात इन्फल्यूएंझाग्रस्तांसाठी कक्ष

राज्यात इन्फल्यूएंझाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. इन्फल्यूएंझाबाबत नियमित रूग्ण सर्वेक्षण, सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू सदृष्य रूग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार करण्यात येत आहे. तसेच राज्यातील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. रूग्णालयांमध्ये आवश्यक औषधोपचार व …

Read More »