Breaking News

अर्थविषयक

इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीचे निकाल केले जाहीर लाभांशाचीही घोषणा

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने गुरूवारी चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकालांनुसार, सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा वार्षिक ३.१ टक्क्यांनी वाढून ६,२१५ कोटी रुपये झाला आहे. तिमाही निकाल जाहीर करताना इन्फोसिसने गुंतवणूकदारांना प्रति शेअर १८ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. …

Read More »

सर्वसामान्यांना दिलासा, किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये १.८१ टक्के घटली महागाई या ठिकाणी घटली

सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत १.८१ टक्क्यांची घट झाली आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्टमध्ये तो ६.८ टक्के होता. जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्के होते. खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात शहरी चलनवाढीचा …

Read More »

तीन खाजगी बँकांची एफडीवरील व्याजदरात कपात या तीन बँकांनी केली व्याज दरात कपात

अ‍ॅक्सिस बँक, येस बँक आणि एचडीएफसी बँक यांनी एफडीवरील व्याजदरात ऑक्टोबरमध्ये कपात केली आहे. व्याजदरामध्ये सुधारणा केल्यानंतर अ‍ॅक्सिस बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ३ टक्के ते ७.१० टक्के व्याजदर देईल. नवीन व्याजदर १० ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने २ वर्षांवरून ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीचा व्याजदर …

Read More »

राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हजचा आयपीओ १७ ऑक्टोबर रोजी उघडणार ४७-५० रूपये प्रतिशेअर असणार

राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हजचा आयपीओ गुंतवणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी उघडणार आहे. कंपनीने या आयपीओसाठी किंमत ४७-५० रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हज ही कॅस्टर ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीओतून ४७.८ कोटी रुपये उभारणार आहे. अँकर गुंतवणुकदारांसाठी आयपीओ १६ ऑक्टोबर रोजी उघडेल. आयपीओ २० ऑक्टोबर रोजी बंद होईल. राजगोर कॅस्टर …

Read More »

सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक १६०००० हजार कोटींची गुंतवणूक झाली

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात सप्टेंबर महिन्यात १६,००० कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे. तर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत ३० टक्के घट झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ईन इंडिया (AMFI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडांमध्येसप्टेंबर २०२३ मध्ये १४०९१.२६ कोटी रुपयांची …

Read More »

टीसीएसने केली लाभांशाची घोषणा शेअर्स बायबॅकही करणार

आयटी कंपनी टीसीएस ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी १५ टक्के प्रीमियमवर शेअर्स बायबॅक करणार आहे. त्यानुसार कंपनी सुमारे १७,००० कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. टीसीएसने  ११ ऑक्टोबर रोजी सांगितले की शेअर बायबॅक ४,१५० रुपये प्रति शेअर या दराने केला जाईल. बायबॅक अंतर्गत …

Read More »

मुलीच्या आर्थिक सुरक्षेसाठी उघडा सुकन्या खाते जाणून घ्या योजनेशी संबंधित खास गोष्टी

आज ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. या दिवशी मुलींना त्यांच्या अधिकारांची आणि सक्षमीकरणाची जाणीव करून दिली जाते. मुलींना आर्थिक सुरक्षेसाठी शासनाकडून सुकन्या समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक ८ टक्के व्याज दिले जात आहे. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा द्यायची असेल, …

Read More »

गुंतवणूकदारांना परतावा देण्यात या ५ आयटी कंपन्या पुढे ४ वर्षात ३.२८ लाख कोटी रुपये दिले

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अनेक प्रकारे कमावतात. शेअर्सच्या किमती वाढण्याव्यतिरिक्त कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश आणि बायबॅकद्वारे परतावा देतात. या पद्धतींद्वारे भागधारकांना परतावा देण्यात आयटी कंपन्या खूप पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. टॉप ५ आयटी कंपन्या टॉप ५ सूचिबद्ध आयटी कंपन्यांनी गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये लाभांश आणि शेअर बायबॅकद्वारे त्यांच्या …

Read More »

मुकेश अंबानींनी गौतम अदानींना पुन्हा मागे टाकले बायजूचे रवींद्रन श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

हुरुन इंडियाने आज देशातील श्रीमंतांची यादी जाहीर केली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र यंदा अंबानी त्यांच्या पुढे गेले. अंबानींची संपत्ती अदानीपेक्षा ३.३ लाख कोटी रुपये जास्त आहे. …

Read More »

आयएमएफने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला चीनला दिला दणका

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला आनंदाची बातमी दिली आहे. आयएमएफने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. यापूर्वी आयएमएफने भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.१ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला होता पण आता तो ६.३ टक्के केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणणे आहे की एप्रिल ते जून या तिमाहीत खूप मजबूत खप …

Read More »