Breaking News

अर्थविषयक

देशातील जीएसटी प्रणालीची धुरा आता अर्थमंत्री अजित पवारांच्या हाती ‘जीएसटी’ सोपी, दोषविरहीत करण्यासाठी अर्थमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन

मुंबई: प्रतिनिधी वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रूटी दूर करुन ती सहज, सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रीगट स्थापन करण्यात आला आहे. मंत्रीगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परीषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रीगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील …

Read More »

दुकानदारांनोः खाद्यपदार्थ पॅकेट, बिलावर FSSAI रजिस्ट्रेशन नंबर अनिवार्य अन्यथा होणार कारवाई १ ऑक्टोबरपासून नियम लागू

मुंबईः प्रतिनिधी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (एफएसएसएआय – FSSAI) खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या सर्व दुकानदारांना १ ऑक्टोबरपर्यंत आपली नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच १ ऑक्टोबरपासून खाद्यपदार्थांशी संबंधित दुकानदारांना मालाच्या बिलावर FSSAI नोंदणी क्रमांक लिहिणे अनिवार्य आहे. याशिवाय डिस्प्लेमध्ये दुकानापासून ते रेस्टॉरंटपर्यंत सर्वांना ते कोणते खाद्यपदार्थ वापरत आहेत ते …

Read More »

दोन महिन्यात गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी, ३० आयपीओ येणार कंपन्या ४५ हजार कोटी रूपयांची रक्कम उभारणार

मुंबईः प्रतिनिधी आगामी दोन महिन्यात आयपीओ (प्राथमिक समभाग विक्री) बाजारात तेजी असेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जवळपास ३० कंपन्या भांडवल उभारणीसाठी आयपीओ आणणार आहेत. यामधून या कंपन्या ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभारू शकतात. आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित अधिक कंपन्या आहेत. पॉलिसीबाजार (६०१७ कोटी रुपये), एमक्योर फार्मास्युटिकल्स (४५०० कोटी रुपये), …

Read More »

या चार राज्यांमध्ये डिझेल १०० पार, सलग दुसऱ्या दिवशी डिझेल महागले महाराष्ट्रात १०० च्या जवळ

मुंबईः प्रतिनिधी देशात सलग दुसऱ्या दिवशी डिझेलचे दर वाढले आहेत. सोमवारी डिझेलच्या दरात २५ पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. दरवाढीनंतर मुंबईत डिझेलचा दर प्रती लिटरला ९६.९४ रुपये झाला आहे. तर दिल्लीत डिझेल भाव ८९.३२ रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी रविवारीही डिझेलच्या किमतीत २५ पैशांनी वाढ …

Read More »

कर भरत नसला तरी भरा आयटीआर, हे आहेत फायदे कर्ज, व्हिसा, पत्याचा पुरावा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर

मुंबई: प्रतिनिधी जर तुमचे उत्पन्न कर सूट मर्यादेत येत असेल तर तुम्हाला आयटीआर दाखल करणं आवश्यक नाही. मात्र, आयटीआर दाखल केल्यास आपल्याला बरेच फायदे मिळतात. तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी तुम्ही आयटीआर दाखल करणं फायदेशीर असेल. आयटीआर दाखल केल्याने कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया. कर्ज सहज मिळते आयटीआर …

Read More »

गुंतवणूक न करता घ्या फ्रॅचायझी, महिन्याला कमवा घशघशीत आधार कार्ड तयार करण्याची फ्रॅचायसीचा घेण्याची संधी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा कठीण काळात नवीन व्यवसाय सुरू करूनही तुमचा संसाराचा गाडा सुरू राहू शकतो. आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाच्या कल्पना सांगणार आहोत, जिथे काहीच गुंतवणूक न करता व्यवसाय सुरू करता येईल. हा व्यवसाय आधार कार्ड संबंधित आहे. सध्याच्या काळात आधार कार्ड महत्वाचं आहे. आधारचा …

Read More »

डिझेल महागले, पेट्रोलचा दर स्थिर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होवूनही दर स्थिर

मुंबई: प्रतिनिधी पेट्रोलियम कंपन्यांनी १८ दिवस इंधन दरवाढ स्थिर ठेवल्यानंतर आता पुन्हा एकदा भाव वाढवले आहेत. शुक्रवारमध्ये डिझेलच्या दरात २० पैशांची वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरात मात्र वाढ करण्यात आली नाही.  पेट्रोलचा भाव सलग १९ व्या दिवशी स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहे. मात्र, देशात पेट्रोलियम कंपन्यांनी …

Read More »

अवघ्या ६ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत स्मार्टफोन, ‘हे’ आहेत पर्याय स्मार्ट फोन आता आपल्या बजेटमध्ये

मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षात स्मार्टफोन ही अत्यावश्यक गरज झाली आहे. कमी किंमतीत आणि चांगले फिचर (features) असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. स्वस्तातील आणि चांगले तसंच आवश्यक फिचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण होऊ शकते. तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल …

Read More »

एलआयसीच्या आयपीओमध्ये सरकारला नकोय चिनी गुंतवणूक रोखण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यांयाचा विचार

मुंबई: प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी -LIC) चा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओ (IPO) मध्ये सरकार चिनी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर बंदी घालू शकते. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादामुळे भारत सरकार हे पाऊल उचलले जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशांतर्गत विमा बाजारात …

Read More »

१ ऑक्टोबरपासून टाटाची वाहने महागणार टाटा कंपनीने केली घोषणा

मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी टाटा मोटर्सची वाहने आता महागणार आहेत. आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा टाटा मोटर्सने केली आहे. १ ऑक्टोबरपासून किमतीतील ही वाढ लागू होणार आहे. टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती २ टक्क्याने वाढवणार आहे. किंमतीतील वाढ मॉडल आणि वाहनाच्या व्हेरिअंटवर आधारीत असणार आहे. …

Read More »