Breaking News

कृषी

फडणवीसांच्या गतीमान सरकारच्या काळातील रखडलेल्या कृषि पुरस्कारांचा वितरण सोहळा १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान! २ मे रोजी नाशिक येथे कृषि पुरस्कार प्रदान सोहळा

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतीमान कारभाराच्या काळात राज्यातील कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन- उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा कार्यक्रम रखडला होता. तो आता २ मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते …

Read More »

महिला शेतकऱ्यांचाही यापुढे सन्मान करणार वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

शेती हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आधार आहे. एकेकाळी इतर देशातून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात करावा लागणारा आपला देश आज अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला आहे. हरित क्रांती व श्वेत क्रांती नंतर आज नील क्रांतीच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरु आहे. कृषी वैज्ञानिक व कृषी विद्यापीठांनी यापुढे संशोधन कार्य वाढवावे व देशाला जगद्गुरू …

Read More »

अजित पवार यांची मोठी घोषणा, शेतकऱ्याला मिळणारा धान बोनस यंदापासून नाही पण… प्रति एकर मदत विचाराधीन; धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देणार - अजित पवार

शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांच्या हातातच जावी यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे सांगतानाच धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी शासनाने धान खरेदी …

Read More »

शेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रश्नी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले हे निवेदन वीज तोडणीपासून शेतकऱ्यांना तीन महिन्यांची मुदत

सभागृह सुरू झाल्यापासून सातत्याने संसदीय आयुधे वापरून सदस्यांनी तसेच सभागृहाच्या बाहेरही कृषी पंप वीज तोडणीचा विषय उपस्थित केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा अनेकदा या विषयावर प्रश्न उपस्थित करून सभागृहाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, कुणाल पाटील,प्रकाश सोळंके,आमदार कल्याणकर यांनी तसेच विरोधी पक्षांनी हे मुद्दे उपस्थित केले. महावितरण कंपनी …

Read More »

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बॅंकांना सूचना देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण होऊ नये, त्यांना कर्ज मिळावे, यासाठी सर्व संबंधित बँकांना सूचना देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचेसह विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या …

Read More »

आमीर खान, मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सोयाबीन डिजीटल शेती पुस्तकाचे प्रकाशन सोयाबिन डिजिटल शेती शाळा पूर्व मशागत ते कापणीपर्यंत' या पुस्तकाचे लोकार्पण

 राज्यात सोयाबिनचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे. त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सोयाबिन डिजीटल शेती शाळा हे पुस्तक ज्या भागात सोयाबिन क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवू. या  पुस्तकात शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल, असा विश्वास कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. ‘सोयाबिन …

Read More »

हळद उत्पादनाच्या अनुषंगाने सरकारला सूचना करायचीय? मग वाचा समितीचा अहवाल खुला करुन सूचना मागवाव्यात- कृषीमंत्री दादाजी भुसे

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रिया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला अहवाल खुला करुन यावर सूचना मागविण्यात याव्यात, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. आज मंत्रालयात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास …

Read More »

‘पोकरा’अंतर्गत ६५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे डिबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा-प्रकल्प संचालक इंद्रा मालो

मराठी ई-बातम्या टीम नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत, त्यांना तात्काळ अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरु झाली असून चार दिवसांत ३२१ कोटी रुपयांहून अधिक अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. यासंदर्भात कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले होते. त्याची …

Read More »

खतांच्या वाढलेल्या किंमतीवरून मंत्री भुसे यांनी केंद्राकडे केली “ही” मागणी पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र

मराठी ई-बातम्या टीम रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवड योग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किंमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किंमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय …

Read More »

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळविण्यासाठी कृषी विभाग ही यंत्रणा बसविणार ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे-कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

 मराठी ई-बातम्या टीम तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायत स्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी …

Read More »