Breaking News

कृषी

मंत्री पियुष गोयल म्हणाले; मका डाळी कापसासाठी आधारभूत किंमत देण्यास तयार शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे

मागील काही महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतमालाला कायदेशीर हमी भाव द्या या मागणीवरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांबरोबरील सततच्या चर्चेनंतर केंद्र सरकारकडून पाच वर्षांसाठी मका, डाळी आणि कापसासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याची तयारी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी दर्शविली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी पियुष गोयल हे आज बोलत …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, ४० टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवरून शेतकऱ्यांना दिवसा वीज

राज्यातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून ४०,००० कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्यावर्षी ४० टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा …

Read More »

पशुधनाच्या काळजीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या ‘फुले अमृतकाळ’ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) लोकार्पण आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संग्राम जगताप, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी …

Read More »

शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल

शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, …

Read More »

दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार कोटींच्या निधी वितरणास मान्यता

नैसर्गिक आपत्तीत राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत असून खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा …

Read More »

शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेची चौथी फेरी चंदीगढ मध्ये

एकाबाजूला देशातील शेतकऱ्यांच्या कृषी मालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी या मागणीवरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चलो दिल्लीचा नारा देत भारतीय किसन युनियन आणि इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. केंद्रिय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात गुंग झाले आहेत. यापार्श्वभूमीवर …

Read More »

केंद्र सरकारचा एमएसपीला नकार, दिल्लीच्या सर्व सीमांवर १४४ लागू

शेतकऱ्यांच्या शेतमालाला एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत कायदेशीरदृष्ट्या लागू करावी या मागणीवरून पंजाब, हरियाणा राज्याबरोबर देशाच्या इतर भागातील विविध शेतकऱ्यांच्या संघटनांनी चलो दिल्लीचा नारा देत दिल्लीच्या सीमेवर पोहोचले. काल १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटेपासून दिल्लीच्या शंभू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची दिल्लीत प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमले. परंतु शेतकऱ्यांना काहीही करून शंभू …

Read More »

पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती

पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषीमंत्री …

Read More »

शेतकरी- पोलिसांमधील धुमचक्रीमुळे टिकरी बॉर्डर बंद, अडेलतट्टू भूमिका घेतल्यास..

देशातील शेतकऱ्यांच्या संघटनेने शेतमालाला हमी भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा चल्लो दिल्लीची घोषणा देत १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दिवसभरात पंजाब, हरियाणातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी सिंघू अर्थात शंभू सीमावर्ती भागात पोहोचले. पण आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झडप उडाल्याने अखेर दिल्लीच्या दिशेने असलेली टीकरी बॉर्डरवरील सुरक्षा आणखी …

Read More »

अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २१०९ कोटींचा निधी वितरणास मान्यता

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील …

Read More »