Breaking News

कॅन्सर व हृदयरोग रुग्णांना मिळणार स्वस्त दरात औषधे केंद्राची आऊटलेट फार्मसी नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये

मुंबईः प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत देशातील कॅन्सर व हृद्यरोग आजाराने ग्रस्त असलेल्या नागरीकांना स्वस्त दरात औषधे मिळावीत यासाठी स्थानिक पातळीवर आऊटलेट फार्मसी सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे या फार्मसी सुरु करण्यात येणार असून या फार्मसीमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात औषधे मिळणार आहेत.

केंद्र शासनाने एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या केंद्र शासन अंगीकृत कंपनीला देशभरात अमृत (Affordable Medicines and Reliable Implants for Treatment) आऊटलेट फार्मसी उघडण्यासाठी समन्वय अभिकरण (Nodal Agency)  म्हणून नियुक्ती केली आहे.

सदर योजनेअंतर्गत एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कंपनीद्वारे कॅन्सरच्या रुग्णांसाठी लागणारी २०२ प्रकारची औषधेहृदयरोग रुग्णांसाठी लागणाऱ्या १८६ औषधी बाबी आणि १४८ इतर बाबी बाजारभावापेक्षा कमी दराने रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅन्सर व हृदयरोग रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून दिली जात नाहीत.

या फार्मसी सुरु करण्याच्या अनुषंगाने एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास व या करारावर स्वाक्षरी करण्यास संचालकवैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना नुकत्याच जाहीर झालेल्या शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आली आहे.

या सामंज्यस करारान्वये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय- नागपूरशासकीय महाविद्यालय व रुग्णालय- नागपूर व अतिविशेषोपचार रुग्णालय- नागपूर येथे पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्र शासानाची अंगीकृत कंपनी एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत अमृत आऊटलेट फार्मसी (Affordable Medicines and Reliable Implants for Treatment) सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर आणि वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालययवतमाळ या रूग्णालयांमध्येही या फार्मसी सुरु करण्यात येणार आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *