Breaking News

BreakTheChain च्या निर्बंध आणि शिथिलतेबाबत मनात गोंधळ आहे? मग वाचा हे ३० मे २०२१ रोजी जाहीर ब्रेक दि चेन आदेशासंबंधी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

प्रश्न १: कोविड निर्बंधांसाठी प्रशासकीय घटक (महानगरपालिका किंवा जिल्ह्याचा इतर भाग) क, ड किंवा ई यापैकी कोणत्या श्रेणीत असावे हे कोण ठरवते?

उत्तर:- हे निर्णय जिल्हा व्यवस्थापन प्रशासन (डी एम ए) घेते आणि तात्काळ त्याची घोषणा करते. यानंतर वेगवेगळ्या प्रशासकीय घटकांसाठी तिथल्या आवश्यकतेनुसार सदर मापदंड ठरवले जातील.

प्रश्न २- जर एखाद्या महानगरपालिका पालिका क्षेत्र किंवा (जिल्ह्यातील इतर भाग) येथील पॉझिटिव्हिटी दर किंवा भरलेले ऑक्सिजन बेडची संख्या याच्यात बदल होत असेल तर?

उत्तर:- सदर मार्गदर्शक तत्वे २९ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या आदेशांसाठी लागू असेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे भरलेले ऑक्सिडेशन बेड आणि पॉझिटिव्हिटी दर याचा साप्ताहिक आढावा घेतील, बहुदा शुक्रवारी, जेणेकरून येणाऱ्या सोमवार पासून आवश्यक बदल करून त्यांची अंमलबजावणी सुरू होऊ शकेल.

पॉझिटिव्हिटी दर बदलून जिथे  निर्बंधांना शिथील करावे लागणार असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन सदर तरतूद ३० मे २०२१ रोजी दिलेल्या ‘ब्रेक द चेन आदेशाच्या अधीन राहून लागू करू शकते. परंतु त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) कडून परवानगी घ्यावी लागेल. जर पॉझिटिव्हिटी दर आणि भरलेले ऑक्सीजन बेडची टक्केवारी अशाप्रकारे बदलत असेल की, तिथे निर्बंध जास्त कडक करण्याची आवश्यकता भासत असेल, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एसडीएमएला या संबंधी माहिती देऊन निर्बंध आणखी कठोर करू शकते.

प्रश्न ३:- ऑक्सीजन बेडची टक्केवारी काढताना व्हेंटिलेटर बेड/आय सी यु बेड यांची संख्या ही त्यात अंतर्भूत असेल का?

उत्तर:- हॉस्पिटल किंवा वैद्यकीय सुविधा असलेल्या ठिकाणी कोणतेही बेड की ज्याच्याशी ऑक्सिजन पुरवठा संलग्न असेल किंवा त्याची तरतूद असेल, त्यांना ऑक्सिजन बेड म्हणूनच गणले जाईल.

प्रश्न ४:- ३० मे २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात समाविष्ट नसलेल्या सलून/ स्पा / जिम व इतर गैर -आवश्यक आस्थापनांबाबत काय?

उत्तर:- १२ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेश अशा ठिकाणी अंमलात असेल.

प्रश्न ५:- जिल्ह्याबाहेरील किंवा राज्य बाहेरील लोक जर एखाद्या जिल्ह्यातील ऑक्सीजन बेड वरती असतील तर त्या ऑक्सिजन बेडला ‘भरलेला’ म्हणून गृहीत धरावे का?

उत्तर:- सर्व ऑक्सिजन बेड मग ते कोणत्याही व्यक्ती त्यावर असो, त्यांना ‘भरलेले ऑक्सीजन बेड म्हणूनच गणले जाईल.

प्रश्न ६:- जीआरई, जीएमएटी, टीओईएफएल, आयईएलटीएस परीक्षांबद्दल काय?

उत्तर:- कोणत्याही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ये-जा करताना त्यांच्यासोबत एका सज्ञान व्यक्तीस परवानगी असेल. हॉल तिकीट किंवा इतर कोणतेही दस्तावेज यांना प्रवासासाठी वैद्य गृहीत धरण्यात येईल.

प्रश्न ७:- नागरिकांच्या जिल्हाअंतर्गत प्रवासाबद्दल काय?

उत्तर:- जर सदर प्रवास एखाद्या अशा प्रशासकीय घटकासाठी किंवा घटकातून होत असेल की, जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह दर आहे आणि ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, तेथे प्रवास करण्यासाठी परवानगी मिळणार नाही. फक्त कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक आणीबाणीच्या प्रसंगी सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. उपरोक्त प्रशासकीय घटकांत व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांसाठी १२ मे २०२१ ला जाहीर केलेल्या आदेशाप्रमाणे निर्बंध /परवानगी च्या अटी-शर्ती लागू असतील. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *