Breaking News

#BreakTheChain दोन लस घेवून १४ दिवस झालेल्यांसाठी या सर्व गोष्टी खुल्या दुकाने, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल अखेर रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार

मुंबई : प्रतिनिधी

१५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल्स-रेस्टॉरंट, दुकाने, शॉपिंग मॉल आदी गोष्टी सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय लग्नासाठी असलेली लोकसंख्या मर्यादेची अट शिथिल करत हॉल-लॉनच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के पर्यत नागरीकांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय सलून-स्पा आदींनाही उशारीपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून शिथिल करण्यात आलेल्या नियमांची विस्तृत माहिती खालील प्रमाणे…

लोकल प्रवासात टीसी तपासणार लसीचे प्रमाणपत्र

ज्यांनी दोन लसींच्या मात्रा-डोस घेतलेले आहेत त्यांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी राज्य सरकारने दिलेली असली तरी प्रवासा दरम्यान त्या प्रमाण पत्राची तपासणी करण्याचे अधिकारी रेल्वेच्या तिकिट तपासणीकास अर्थात टीसीला देण्यात आले आहे. सदरचे प्रमाणपत्र खोटे आहे किंवा नसल्यास संबधित प्रवाशाला ५०० रूपयांचा दंड आणि १८६० अंतर्गत कायदेशीर करण्यात येआर आहे. त्याचबरोबर ज्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी झालेली आहे त्यांनाच मासिक, त्रैमासिक पास मिळणार आहे.

हॉटेल्स-बार सुरू राहणार रात्री उशीरापर्यंत

राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आधी गोष्टी रात्री १० वाजेपर्यत ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली. त्याचबरोबर या ठिकाणी काम करणाऱे, आचारी, वाढपी, व्यवस्थापक, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे दोन मात्रा घेवून १४ दिवस झालेले असणे आवश्यक करण्यात आले असून त्यांनाच त्या ठिकाणी काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्याबरोबर वातानुकूलित हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये खिडक्या असतील तर त्या उघडे ठेवाव्या लागतील, तसेच दरवाजाही उघडा ठेवणे-फॅन सुरु ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक आहे. सॅनिटायझरची व्यवस्था असणे बंधनकारक करण्यात आली असून हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी रात्री ९ वाजेपर्यत शेवटची ऑर्डर घेणे बंधनकारक करण्यात आली. तर २४ तास पार्सलची सुविधा सुरु ठेवता येणार आहे.

सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यत सुरु राहणार

राज्यातील सर्व पध्दतीची दुकाने रात्री उशीरापर्यंत अर्थात १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुकानातील कर्मचारी-व्यपस्थापनाने लसीच्या दोन्ही मात्रा घेवून त्यास १४ दिवस पूर्ण झालेले असणे बंधनकारक करण्यात आले.

शॉपिंग मॉल्सही १० वाजेपर्यंत सुरु राहणार

शॉपिंग मॉल्सही रात्री १० वाजेपर्यत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र तेथील कर्मचारी-दुकानदारांनी दोन्ही लसीच्या मात्रा घेतलेली असणे आणि त्यास १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेला असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शॉपिंग मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनीही लसीच्या दोन मात्रा घेतलेली असणे आणि त्यास १४ दिवसांचा कालवधी पूर्ण झालेला असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ही अट पूर्ण करणाऱ्या ग्राहकांनाच या ठिकाणी प्रवेश द्यावा असे आदेश राज्य सरकारने सर्व शॉपिंग मॉल्संना दिले आहेत.

जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पाही १० वाजेपर्यत सुरु राहणार

जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून, स्पा आदी वातानुकुलित आणि अवातानुकुलित असलेल्या सर्व गोष्टी रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून मात्र याच्या खिडक्या, दरवाजे उघडे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इनडोअर स्पोर्टसला परवानगी

ज्या खेळाडूंनी लसीच्या दोन मात्रा घेवून १४ दिवसाचा कालावधी पूर्ण केलेला आहे त्यांना खेळण्यास परवानगी देण्यात आलेली असून तेथील कर्मचाऱ्यांनाही ही अट लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बॅडमिटन, टेबल टेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब खेळासाठी फक्त दोन खेळांडूनाच परवानगी देण्यात आलेली आहे.

शासकिय-निमशासकिय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यास प्राधान्य

राज्यातील सर्वच शासकिय, निमशासकिय, बॅकांचे कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी, रेल्वे, खाजगी, औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर प्राधान्यांने पूर्ण करावे असे आदेश सर्व कार्यालयांना बजाविण्यात आले आहे.

ज्या आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लसीच्या दोन मात्रा दिलेल्या आहेत किंवा पूर्ण केलेल्या आहेत. त्या आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसेच या आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी विविध वेळांमध्ये कामाचे व्यवस्थापन करावे असे आदेश देत शक्य असेल तर घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे अशी सूचनाही करण्यात आली आहे.

त्याचबरोबर खाजगी कार्यालयांनी २४ तास आपली कार्यालये सुरु ठेवण्यासही परवानगी दिली आहे. याशिवाय अशा पध्दतीने सुरु राहणाऱ्या कार्यालयात २५ टक्के प्रत्येक कालावधीत उपस्थित ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्र किनारे स्थानिक प्राधिकारणाने विहित केलेल्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

विवाह सोहळ्यास ५० टक्के उपस्थिती

खुल्या प्रांगणातील, लॉनवरील आणि बंदिस्त हॉलमधील लग्न सोहळे आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्या स्थळाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के नागरीकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली. खुल्या प्रांगणात-लॉनमधील लग्नासाठी जास्तीत जास्त २००, बंदिस्त कार्यालयात जास्तीत जास्त १०० व्यक्तींना हजर राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापेक्षा जास्त गर्दी झाल्यास संबधित मंगल कार्यालयाचा परवानगी रद्द करण्यात येणार आहे.

याशिवाय येथील मंगल कार्यालये,हॉटेल, लॉन व्यवस्थापक, बँड पथक, भोजन व्यवस्थापक, भटजी, फोटोग्राफर्स आदी विवाहाशी संबधित व्यक्तीनी दोन लसीच्या मात्रा घेतलेले असणे आणि १४ दिवस पूर्ण झालेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आरटीपीसीआर चाचणी प्रवासासाठी आवश्यक

आंतरराज्य प्रवासासाठी ७२ तासापूर्वी करण्यात आलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह असणे बंधनकारक किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक करण्यात आले आहे.
गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी

वाढदिवस, राजकिय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचारसभा, रॅली, मोर्चे,  इत्यांदीवर निर्बंध कायम राहणार आहेत. थुंकण्यास प्रतिंबध राहणार आहे. मात्र सिनेमागृहे, मंदीरे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

राज्यात ७०० मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सीजनची आवश्यकता भासायला लागल्यास आणि राज्यातील बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यास राज्यात तात्काळ लॉकडाऊन करण्याचा इशाराही राज्य सरकारने यावेळी दिला.

या सवलती आणि नियम १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यात लागू होणार आहेत.

राज्य सरकारची BreakTheChain बाबतचे नवे आदेश खालीलप्रमाणे-:

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *