मुंबईः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात न्यायालयात धाव घेतलेल्या कंगना राणावत हीला मुंबई उच्च न्यायालयाने चांगल्याच कानपिचक्या देत स्वतःच्या वक्तव्यांना आवर घालण्याचे निर्देश दिले. मात्र कंगनाच्या घरावर महापालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत तिला बजाविण्यात आलेली नोटीस अवैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्याला धमकाविल्याचा आरोप कंगना राणावत हीने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात समाज माध्यमातून टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबई महापालिकेने राणावतच्या अनधिकृत कार्यालयाच्या बांधकामाच्या विरोधात नोटीस बजावित बांधकाम तोडण्याची कारवाई केली.
या नोटीसीच्या विरोधात राणावत हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी संजय राऊत यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण मागितले. तसेच कंगनालाही तीने मागितलेल्या वक्तव्यांची माहिती मागितली. त्यावेळी या दोघांनी सादर केलेल्या वक्तव्यांची तपासणी केली असता शिवसेना नेते राऊत यांचे वक्तव्य स्विकाहार्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तर कंगना राणावत हीने आपल्या वक्तव्यांना आवर घालावा आणि अशी वक्तव्ये करणे टाळावे असे निर्देश देत त्या शब्दांच्या ऐवजी चांगल्या पध्दतीने सल्ला देता आला असता असे मत ही न्यायालयाने यावेळी नोंदविले.
