Breaking News

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या वयाच्या ३४ व्या वर्षीचा जगाचा घेतला निरोप

मुंबई: प्रतिनिधी
हिंदी चित्रपटसृष्टीत आताशा कुठे बस्तान बसत असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या बांद्रातील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुशांत हा मुळचा बिहारमधील पाटण्याचा असून त्याचा जन्म १९८४ सालचा आहे.
साधारणत: २००८ साली एका दूरचित्रवाणी वाहीनीवरील पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून त्याने पदार्पण केले. त्यानंतर २०१३ पासून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यावेळी त्याचा चेतन भगत याच्या कांदबरीवरील कोई पो चे हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर २०१६ साली प्रसिध्द क्रिकेटपटू एम.एस. धोनी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात त्याने धोनीची भूमिका साकारली. त्यानंतर आमिर खान बरोबरच्या पीके या चित्रपटात अनुष्का शर्मा हीच्या पाकिस्तानी प्रियकराची भूमिका त्यांने साकारली होती. त्यानंतर डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, शुध्द देसी रोमांस, केदारनाथ, छिछोरे आदी चित्रपटातून त्याने प्रमुख नायकाची भूमिका साकारली.
त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्टपणे समजू शकले नाही. मात्र त्याच्या या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हळहळ व्यक्त करत त्याला आदरांजली वाहीली.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *