Breaking News

अनुभव, क्षितीज आणि ड्रग्ज प्रकरणाशी संबध नाही खोट्या बातम्या बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा प्रसारमाध्यमांना करण जोहरचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून बॉलीवूडमधील कथित ड्रग्ज प्रकरणाशी आणि अनुभव चोप्रा, क्षितीज रवि प्रसाद याचा माझ्याशी व धर्मा प्रोडक्शनशी जोडण्यात येत आहे. त्यासंबधीचे खोटे वृत काही वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमाकडून सातत्याने प्रसारीत करून माझी, कुटुंबियांची आणि माझ्या जवळच्या व्यक्तीची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे खोट्या बातम्या प्रसारीत करण्याचे थांवविले नाही तर मला नाईलाजाने माला कायदेशीर कारवाईच्या मार्गाचा अवललंब करावा लागेल असा इशारा प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक तथा धर्मा प्रोडक्शनचे प्रमुख करण जोहरने ट्विटरच्या माध्यमातून वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांना दिला.

२८ जुलै २०१९ रोजी माझ्या घरी एक पार्टी झाली होती. मात्र त्या पार्टीचे चुकीच्या पध्दतीने वृतांकन करत त्याबद्दल खोटे चित्र रंगविण्यात आले. यासंदर्भात २०१९ मध्येच ते वृत्त खोटे असल्याचा खुलासा त्यावेळी केला. तरीही माझ्याविरोधात खोट्या बातम्या आणि वृत्त प्रसारमाध्यमातून चालविण्यात येत आहे. मी कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही की त्या सेवनाचा पुरस्कार केला नसल्याचा खुलासा त्याने केला.

त्याचबरोबर याप्रकरणातील अनुभव चोप्रा आणि क्षितिज रवि प्रसाद याचा संबध आमची कंपनी धर्मा कंपनीशी जोडण्यात येत आहे. अनुभव चोप्रा हा  धर्मा प्रोडक्शनचा कर्मचारी नाही. परंतु, क्षितीज याने धर्मा प्रोडक्शनबरोबर २०११ आणि १२ द्वितीय असि.डायरेक्टर म्हणून एका प्रोजेक्टमध्ये दोन महिन्यासाठी आणि २०१३ साली एका शॉर्ट फिल्मसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्याव्यतीरिक्त त्याचा आणि आमचा कोणताही संबध नसल्याचा दावा त्याने केला.

Check Also

जेष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे: प्रतिनिधी एकेकाळी हीट अँड हॉट नाटकातून भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *