Breaking News

यारा ओ यारा आणि चलो बुलावा गाण्याचे गायक नरेंद्र चंचल यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्लीः प्रतिनिधी
एकेकाळी यारा ओ यारा तेरी अदाओने मारा आणि चलो बुलावा आया है या गाण्याने संपूर्ण गीत रसिकांमध्ये स्वतःचे आगळे-वेगळे स्थान मिळविणाऱ्या गायक नरेंद्र चंचल यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८० वर्षाचे होते.
मागील दोन-तीन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
बेनाम या चित्रपटात त्यांना पहिला ब्रेक मिळाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील यारा ओ यारा या गाण्याने चांगलाच धुमाकुळ घातला होता. तसेच त्यावेळच्या नामवंत गायकांना पर्याय म्हणून पाहिले जात होते.
त्यानंतर बॉबी चित्रपटातील बेशक मंदिर-मस्जिद तोडो, गाणे गायले, चित्रपट सिने रसिकांनी या गीताला चांगलीच दाद दिली. याशिवाय चलो बुलावा आया है या स्व.राजेश खन्ना प्रमुख अभिनित अवतार चित्रपटासाठी गायलेले गाण्याने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यानंतर जितेंद्र अभिनित आशा चित्रपटातील तुने मुझे बुलाया माँ शेरावाली या गाण्याने त्यांची भक्ती गाणी गाणारे गायक म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी याच पध्दतीची गाणी शेवटपर्यंत गायली. याशिवाय अन्य काही चित्रपट गीतेही त्यांनी गायली.

Check Also

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार- क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *