Breaking News

वाझेंच्या आरोप प्रकरणी मोक्का नुसार कारवाई करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटीत गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.राहुल नार्वेकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, माजी खा. किरीट सोमय्या, प्रदेश सचिव संदीप लेले या प्रसंगी उपस्थित होते.

परमबीर सिंग, वाझे या पोलीस अधिकाऱ्यांकडून जी माहिती समोर येत आहे, ती अत्यंत धक्कादायक आहे. या बाबतचे सबळ पुरावे सादर झाले तर या प्रकरणी संबंधित व्यक्तींच्या विरोधात संघटित गुन्हेगारी च्या (मोक्का) कलमाखाली गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला जो न्याय लावला जातो तोच न्याय या प्रकरणात नामोल्लेख झालेल्यांना लावावा. वाझे यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेऊन मंत्री अनिल परब यांनी जो त्रागा बाळासाहेब ठाकरेंचे शपथ आणि मुलींची शपथ घेवून व्यक्त केला. त्यापेक्षा त्यांनी एनआयए, सीबीआय समोर जाऊन आपले स्पष्टीकरण द्यावे असे ते म्हणाले.

कोरोना स्थिती हाताळण्यात आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. लसीकरण कार्यक्रमाचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. आपले अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे. मात्र केंद्राकडून दिल्या गेलेल्या लशींची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातून राज्याचा खोटेपणा उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.

हे सरकार महावसुली सरकार असून या सचिन वाझे आणखी यांच्या विरोधात बोलेल अशी भीती वाटत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *