Breaking News

आघाडी सरकार SC-ST च्या सर्व योजना बंद करण्यासाठीच काम करतेय माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप

नागपूर-मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्रातील आघाडी सरकार अनु.जाती/अनु.जमाती यांच्या सगळ्या योजना बंद करण्यासाठी काम करते हे दिड वर्षातील सरकारच्या कामकाजावरून सिद्ध झाले आहे. हे सांगत असताना कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे सांगत नाही तर ह्या समाजाचा घटक म्हणुन मागील दिड वर्षात सरकार मागासवर्गीय समाजाचे संवैधानिक चौकटीतील निर्णय घेत नाही हे दिसून येत असल्याचा आरोप माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला.

१)राज्य अनुसूचित जाती अनु जमाती आयोग:

राज्य सरकारने अनुसूचित जाती,अनु जमाती यांचेवर होणाऱ्या अत्याचार व अन्याय दूर करण्यासाठी व त्यांचे प्रश्नांवर सुनावणी घेऊन न्याय देण्यासाठी राज्य अनु. जाती,व अनु.जमाती आयोगाची स्थापना केली होती. परंतु ३० जुलै २०२० पासून या आयोगावर एकही सदस्य नियुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे आयोगात कोणत्याही सुनावणी होत नाहीत. आजच्या घडीला महाराष्ट्रातील सुनावणी करीता चार हजारांच्यावर प्रकरणे आयोगाकडे प्रलंबित आहेत. अनु.जाती, जमाती आयोग आजच्या घडीला जवळपास पुर्णतः बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोणत्याही अनु.जाती/अनु.जमातीवर अन्याय झाला तर आयोगात ऐकून घेणारे कुणीही नाहीत.

२)राज्य स्तरीय अन्याय अत्याचार निवारण संनियंत्रण व दक्षता समिती:

केन्द्र सरकारने १४ एप्रिल २०१६ ला अनु.जाती/अनु जमाती अत्याचार निवारण संशोधन कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार एका कॅलेंडर वर्षात राज्य सरकारला कमीतकमी वर्षातुन दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै या महीन्यात राज्यस्तरीय संनियंत्रण व दक्षता समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे. या संनियंत्रण व दक्षता समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. राज्याचे गृहमंत्री, वित्तमंत्री, सामाजिक न्याय, आदिवासी विकास मंत्री, विधी व न्यायमंत्री, पोलीस महासंचालक व इतर उच्चस्तरीय इत्यादी सदस्य असतात. या समितीने राज्यातील अत्याचारग्रस्त व पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी यंत्रणांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन योग्य कार्यवाही करणे गरजेचे असते. परंतु हे सरकार स्थापन झाल्यानंतर एकही बैठक झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील ३१७ अत्याचार ग्रस्त व पिडीतांना, किंवा त्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. राज्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावर होणारे अत्याचार व अन्याय दूर करण्यासाठी सरकार काम करीत नसल्याने सरकार विरोधात मागासवर्गीय समाजात रोष निर्माण होताना दिसत आहे. त्यातच पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्यामुळे हे सरकार मागासवर्गीय विरोधी असल्याचे सिद्ध झाल्याचे ते म्हणाले.

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *