Breaking News

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.भामरे, सोमय्या, पोटे-पाटील, गोगावले, कांडलकर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली नियुक्ती

मुंबईः प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे (धुळे), माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), योगेश गोगावले (पुणे) व अशोक कांडलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच भाजपा, प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या असून त्या पुढीलप्रमाणे पुणे शहराध्यक्ष आ. माधुरीताई मिसाळ, पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर, जालना जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे व यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यातील माध्यमांच्या संपर्क प्रमुखपदाच्या जबाबदारीसह मा. केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त प्रवक्ते पुढीलप्रमाणे मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर आदींची नियुक्ती करण्यात आली.
अन्य काही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे व वैयक्तिक कारणांमुळे प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आर. सी. पाटील व रमेश कुथे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर व व्यापारी आघाडी दिलीप कंदकुर्ते आदींना संघटनेच्या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

Check Also

इराणच्या राजदूताचे आश्वासन, जहाजावरील भारतीय क्रु मेंबर्संना लवकरच सोडू

इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणच्या सैन्याने ताब्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *