Breaking News

भाजपाचे नवाब मलिकांना आव्हान आरोपाचा पुरावा द्या अन्यथा… भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे ट्विटरवरून केली मागणी

मुंबई: प्रतिनिधी

रेमडेसिवीरच्या कुप्या महाराष्ट्रात विकण्यास केंद्र सरकार परवानगी देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिक यांना आव्हान देत त्या संबधीचा पुरावा द्या अन्यथा माफी मागा अशी मागणी केली.

मागील काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या अनेक रूग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. या इंजेक्शनच्या तुटवड्यास केंद्रातील मोदी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रावर गंभीर आरोप केले.

त्यावर केशव उपाध्ये म्हणाले की, या कंपन्यांनी गुजरात राज्यात रेमडेसिवीर औषध विकण्याची परवानगी मागितली. त्यानुसार गुजरात सरकारने त्यांना परवानगी दिली. यात केंद्र सरकारचा कुठे संबध येतो असा सवाल उपस्थित करत केंद्राने तसे आदेश दिल्याचा पुरावा द्या अन्यथा माफी मागा अशी मागणी करत मलिक यांना आव्हान दिले.

Check Also

फणसळकर यांच्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती संचालक पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या

मुंबई : प्रतिनिधी ठाणे पोलिस आयुक्त व्ही.व्ही.फणसळकर यांना पदोन्नती देत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *