Breaking News

चला, आता निवडणूकीतील विजयाचा मार्ग मोकळा

शिवसेना-भाजपचे खासदार, मंत्री, आमदार झाले निर्धास्त
मुंबईः प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूकीत विजय मिळेल का ?, युती होईल का ?, युती न झाल्यास काय करायचे ? असे एक ना अनेक प्रश्नांच्या भीतीने सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या खासदार, मंत्री आणि आमदारांना पिच्छा पुरविला. मात्र काही दिवसांपूर्वी युतीची भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औपचारीक घोषणा केल्याने चला आता निवडणूकीतील विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया अनेक खासदार, मंत्री आणि आमदारांनी व्यक्त करत आता निर्धास्त झाल्याची प्रतिक्रियाही अनेक राजकीय व्यक्तींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वर्षी शिवसेनेने वार्षिक मेळाव्यात आगामी काळातील कोणत्याही राजकिय पक्षाशी युती करणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी विशेषतः चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी फेऱ्या मारल्या. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील सरकारच्या धोरणावर सामना मुखपत्रातून सातत्याने टीका करण्यात येत होती. मात्र मातोश्रीवरून युती करण्याबाबत कोणतीही घाई करण्यात येत नसल्याचे चित्र राज्यातील जनतेला पाह्यला मिळाले.
याउलट भाजपमधील काही विद्यमान मंत्री, आमदारांचा अपवाद वगळता सर्वांनाच केंद्राबरोबरच राज्यातील सत्तेत सहभागी होण्याची इच्छा निर्माण झाल्याने अनेक खासदार, आमदार, मंत्र्यांनी भाजपश्रेष्ठींना वारंवार शिवसेनेशी युती होण्याबाबत सूचना केल्या. तसेच शिवसेनेशी युती केली नाहीतर पुन्हा आपल्या हाती सत्तेचा सोपान मिळणे अवघड असल्याची भीती दाखवीत पराभवाच्या छायेची महत्ता पठवून दिल्याची माहिती भाजपमधील एका मंत्र्याने सांगितले.
मात्र आता युती झालेली असल्याने आमच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आता निर्धास्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
तर याउलट दुसऱ्याबाजूला आगामी निवडणूकीच्या निमित्ताने भाजपबरोबर युती करण्याबाबत दोन मतप्रवाह पडल्याचे उघडकीस आले. शिवसेनेतील अनेक आमदारांनी युती करण्यास विरोध दर्शवित एकला चलो-रेचे धोरण स्विकारण्याची भूमिका मांडली. तर खासदारांनी भाजपशी युती झाली तरच आपल्याला विजय मिळेल अन्यथा आपला पराजय निश्चित असल्याची भीती दाखवित खासदाराकी, आमदारकी मिळविण्यासाठी आम्ही प्रसंगी इतर पक्षांचा दरवाजा ठोठावू असा गर्भित इशाराही काही जणांनी दिल्याचे शिवसेनेच्या एका वजनदार खासदारांने सांगितले.
त्यामुळेच अखेर युती झाल्याचे सांगत किमान शिवसेनेकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरणाऱ्या खासदारांचा विजय निश्चित झाल्याचे सांगत आता निर्धास्त व्हायला काय हरकत आहे ? असा दिलासादायक सवालही त्यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *