Breaking News

भाजपला लागलेली उतरती कळा कोणी रोखू शकणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित

मुंबईः प्रतिनिधी
मागील दिड-दोन वर्षात भाजपाच्या हातून राज्ये हातून जात असून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंड सारखी हाती राहीलेली नाहीत. भाजपाच्या कारभारावर लोकांचा आता विश्वास राहीलेला नसल्याने त्यांची आता उतरती कळा लागली असून ही उतरती कळा कोणी रोखू शकणार नसल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
झारखंड विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तेथील जनतेचे आभार मानण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशात नागरीकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणी हे दोन्ही कायदे लागू करण्यात आले. या दोन्ही कायद्यामुळे देशातील दोन धर्मियांमध्ये एकप्रकारचे अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही कायद्याला जनतेचाच विरोध असल्याचे सुरु असलेल्या आंदोलनावरून दिसत आहे. देशातील जनता योग्यवेळी संधी पाहून निर्णय घेईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दिल्ली कि अन्य ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकत्व कायद्याच्या मुद्यावर बोलताना म्हणाले की, या कायद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली नाही. मात्र संसदेत चर्चा करण्यात आली. वास्तविक पाहता कोणताही धोरणात्मक निर्णय जाहीर करायचा असेल तर मंत्रिमंडळात आधी चर्चा केली जाते. त्यानंतर तो संसदेत प्रस्ताव मांडण्यात येतो. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
या दोन्ही कायद्यामुळे कारण नसताना देशातील शहरांमध्ये, राज्यांमध्ये अवस्थता असल्याचे पाह्यला मिळते. त्यामुळे जनतेने
आंदोलन करताना शांतता मार्गाने आणि महात्मा गांधी यांच्या मार्गाने आंदोलन करत सरकारी मालमत्तेच रक्षणही करा असे आवाहनही त्यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केले.
झारखंडच्या निकालाने निवडणूकीत संपत्तीचा वापर करणाऱ्यांचा तेथील जनतेने केला आहे. तसेच तेथील जनतेचा भाजपाच्या कारभारावर विश्वास राहीला नसल्यानेच त्यांचा पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *