Breaking News

भाजपाच्या केंद्रीय कार्यकारणीत मुंडे, तावडे राष्ट्रीय सचिव, तर हिना गावित राष्ट्रीय प्रवक्ते महाराष्ट्रातून ७ जणांची वर्णी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणूकीत उमेदवारी मिळेल म्हणून आशेवर बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचे तिकिट पुन्हा कापण्यात आले. परंतु यापैकी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना थेट राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात स्थान देत पक्षाच्या केंद्रीय सचिव पदी अर्थात राष्ट्रीय मंत्री पदी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केंद्रीय कार्यकारणी जाहीर करताना नियुक्ती केली.

या दोघांसह राज्यातील राज्याचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही.सतीश यांची तर सुनिल देवधर, विजय रहाटकर, हिना गावित, संजू वर्मा यांची केंद्रीय कार्यकारणीवर नियुक्ती करण्यात आली.

यापैकी पक्षाच्या सचिव पदी मुंडे, तावडे यांच्यासह महाराष्ट्रातून सुनिल देवधर आणि विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी जमाल सिध्दीकी तर राष्ट्रीय प्रवक्ते पदी हिना गावित आणि मुंबईतू संजू वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.

निवडणूकीत पराभूत झाल्याने आपल्याला सतत डावलेले जात असल्याची भावना मुंडे यांनी बोलून दाखविली होती. तसेच पक्षात होत असलेल्या घुसमुटीबद्दल लवकरच जाहीर भूमिका घ्यायची वेळ आल्याचे भगवान गडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेत घोषणा केली. मात्र कालांतराने त्यांनी बंडाचे निशाण खाली उतरवत शांत राहणेच पसंत केले. तर विनोद तावडे आणि एकनाथ खडसे हे आपले पुर्नवसन व्हावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र केंद्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी एकनाथ खडसे यांना वगळता नाराजांच्या यादीत असलेले मात्र शांत राहणे पसंत केलेल्या विनोद तावडे यांची सचिव पदी नियुक्ती केली.

 

Check Also

लेकाच्या अभियानात बापाने उचलला खारीचा वाटा जयंत पाटील यांनी उचलला दहा जणांच्या लसीचा खर्च

सांगली: प्रतिनिधी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *