Breaking News

आता मनसेचा पर्दाफाश भाजपा करणार अरे लाव तो व्हीडीओ २७ तारीखला दाखविणारः विनोद तावडे

मुंबईः प्रतिनिधी
लाव रे तो व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या एका वाक्याने भारतीय जनता पार्टीची झोप उडाली असून, आता भाजपा देखील राज ठाकरे यांच्या स्टाईलमध्ये मनसेला उत्तर देणार आहे. येत्या २७ एप्रिलला म्हणजेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा सभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांच्या सभांची पोलखोल करणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी काळा चौकी येथे जाहीर सभा घेत योगेश चिले या कुटुंबाचा फोटो कशा पद्धतीने भाजपाने खोट्या जाहिरातीसाठी वापरला याचे वास्तव राज ठाकरे यांनी मांडत राज यांनी चिले कुटूंबाला व्यासपीठावर आणल्याने भाजपाची झोप उडाली. मात्र चिले यांचा फोटो हा भाजपाच्या कोणत्याही अधिकृत पेजवर नसल्याचे विनोद तावडे यांनी हे सांगितले.
चिले परिवाराचा फोटो हा न्युयॉर्क टाइम्स मध्ये झालेल्या एका मुलाखतीत छापण्यात आला. पाकिस्तान मधील एका साईटवर देखील हा फोटो आहे. आणि योगेश चिले हा मनसेचाच कार्यकर्ता असल्याचे तावडे यांनी सांगितले. पाकिस्तानातील एका वेबसाईटवर असून राज ठाकरे यांनी दाखवला तो आहे. त्यामुळे मनसे पाकिस्तान काही कनेक्शन आहे का? असा संशय देखील तावडे यांनी उपस्थित केला. तसेच मोदींजींच्या फॅनच्या अनेक साईट आहेत. त्या साईट वर हा फोटो पोस्ट केला गेला असे तावडे यांनी सांगितले. मनसेचे कार्यकर्ते आता लक्ष्मी दर्शन करत आहेत. त्यावरून आपल्या लक्षात येते की राज ठाकरे कुणासाठी काम करत आहेत ते असे देखील ते म्हणाले.

Check Also

२४-२५ कोटी लस वाटपासाठी टास्क फोर्स पण राजकारण न करण्याची सूचना द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *