Breaking News

केंद्रीय मंत्री दानवेंचा व्हिडीओ ट्विटरने ठरविला पोटेंन्शियल सेन्सिटीव्ह विभागाने केलेल्या कामाच्या जाहिरातीचा व्हिडिओ

मुंबई : विशेष प्रतिनिधी

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीसह संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसऱ्याबाजूला भाजपा केंद्रीय मंत्र्यांकडून कृषी विभागाशी संबधित असलेल्या विभागांनी काय काय कामे केली याची जाहिरात करण्यात येत आहे. अशाच पध्दतीचा एक व्हिडिओ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या ट्विटर अकॉऊंटवर शेअर केला असता तो व्हिडिओ पोटेंन्शिअल सेंसेटीव्ह असल्याचे ट्विटरने जाहीर करत तो सहज दिसणार अशी व्यवस्था केल्याची धक्कादायब बाब उघडकीस आली.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि केंद्रीय मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या  विकासासाठी करण्यात येत असलेल्या आणि त्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयाची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दानवे यांनी स्वत:च्या ट्विटर अकॉउंट वरून त्यांचा विभाग असलेल्या खाद्य सुरक्षा आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या कामाच्या जाहिरातीचा व्हिडिओ प्रसिध्द केला. मात्र ट्विटरने तो व्हिडिओच सेंन्सेटीव्ह ठरवित सहज दिसणार नाही अशी व्यवस्था केली. जर तो ट्विटर वापरकर्त्याला तो पाह्यचा असेल तरच तो व्हिडिओ पाहता यावा यासाठी ट्विटरने सोय केली.

देशात पहिल्यांदाच एखाद्या केंद्रीय मंत्र्याने केलेले ट्विट ट्विटरने सेन्सिटीव्ह म्हणून जाहीर केले आहे. यावरून भाजपाच्या मंत्र्याच्या माहितीवर ट्विटरचा भरोसा राहिला नाही अशी चर्चा सोशल मिडिया वापरणाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.

Check Also

द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक

१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *