Breaking News

याच ट्विटमुळे भाजपाशासित राज्यात अभिनेत्री कंगना विरोधात गुन्हा दाखल होणार कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना आदेश

बंगलोर : वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी संसदेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्या विरोधावर टीका करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हीने शेतकऱ्यांना लक्ष्य करत ट्विट्द्वारे आंतकवादी असल्याची टीका केली. त्यावर तुमकुरू जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता त्यावरील सुणावनी दरम्यान न्यायालयाने कंगना हिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले. महाराष्ट्र राज्य आणि बॉलीवूड विरोधात भूमिका घेणाऱ्या कंगनाला भाजपाने पाठबळ देत तीला वाय सुरक्षा पुरविली. त्याच भाजपाच्या राज्यात तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

राणावत हिने केलेल्या ट्विटच्या अनुषंगाने स्थानिक वकील रमेश नाईक यांनी प्रथम मॅजिस्ट्रेटकडे यासंदर्भात याचिका दाखल केली. त्यावर सदर न्यायालयाने कंगना राणावत हिच्या विरोधात एफआयआर दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे नाईक यांनी सांगितले.

Check Also

मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेतल्यानंतरही कोरोना होतो पंतप्रधानांनी बैठकीत सांगितल्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाला रोखण्याचा भाग म्हणून जरी लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत असली तरी लस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *