Breaking News

दंगलीवरून भाजपाच्या माजी मंत्र्यांचे शरद पवारांबद्दल खळबळजनक विधान ज्या दंगली होतात त्या शरद पवारांच्या आशिर्वादाने- माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा आरोप

अमरावती-मुंबई: प्रतिनिधी

भाजपाने पुकारलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर भाजपाचे माजी कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक विधान करत जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात. अमरावती, नांदेडमध्ये ज्या दंगली होत आहेत त्या शरद पवार यांच्या आशिर्वादाने होत असल्याचा गंभीर आरोपही बोंडे यांनी केला.

विशेष म्हणजे राजकमल चौकात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळी डॉ.अनिल बोंडे हे घटनास्थळी पोहचून पोलिस आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या भेटी घेत होते.

काल अमरावती मध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा पोलीस कुठे होते, आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरले तर पोलीस प्रशासन सरकार व नेत्यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी सुद्धा आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

आज पोलिसांनी आंदोलक हिंदूंना अडवले त्यांच्यावर लाठीमार, पाणी फेकले, अश्रू वार केले. परंतु हे मुस्लिम आज सुद्धा खुलेआम देशी कट्टे आणि तलवारी घेऊन फिरत आहेत. परंतु कारवाई फक्त हिंदुवरच का? पोलिस प्रशासन ह्याच्यावर का कारवाई करीत नाही, त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे हे आधी स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *