Breaking News

पुन्हा आलेले देवेंद्र सरकार ३० तारखेला बहुमत सिध्द करणार राज्यपालांनी दिली सात दिवसांची मुदत

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीदरम्यान मी पुन्हा येईनची घोषणा देणारे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली घोषणा खरी करून दाखवित आज नाट्यमय पध्दतीने राजकिय हालचाली करत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या नव्या देवेंद्र सरकारला राज्यपालांनी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतची आपले बहुमत सिध्द करण्याची मुदत दिली.
राज्यात भाजपातेर शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याची अटकळ सर्वांनीच बांधली होती. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासून नाट्यमय घडामोडींनी सुरुवात होत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार हे भाजपाच्या वळचणीला गेले. तसेच त्यांनी पाठिंब्याची कागदपत्रे सादर करत भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांसमोर स्पष्ट केले.
या सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी ७ दिवसांची अर्थात ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली. मात्र अजित पवार यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार नसल्याचे चित्र सध्यातरी शरद पवार यांच्या पुढाकाराने स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांनी शपथविधीला बोलाविलेल्या १० ते १२ आमदारांपैकी ७ आमदारांनी अजित पवारांऐवजी शरद पवारांसोबत जाण्याचे जाहीर केल्याने भाजपाच्या देवेंद्र सरकारच्या मागे उभे राहणारे संख्याबळ कमी होणार असल्याचे दिसून येत आहे.
तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सरकार विधानसभेत बहुमत सिध्द करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *