मुंबईः प्रतिनिधी
१ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज भाजपा उमेदवारांची नावे घोषित केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी दिली.
उमेदवारांची नावे अशी आहेत –
१) औरंगाबाद ( पदवीधर ) – शिरीष बोराळकर
२) पुणे ( पदवीधर ) – संग्राम देशमुख
३) नागपूर ( पदवीधर) -संदीप जोशी
४) अमरावती ( शिक्षक मतदार संघ ) – नितीन धांडे
प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले.
