Breaking News

पूजा चव्हाण प्रकरणः मंत्र्यांसोबत तरुणीचे फोटो प्रसिद्ध होऊनही कारवाई का नाही ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई: प्रतिनिधी
तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असेलेले व लपून बसेलले राज्य सरकारमधील एक मंत्री आज १५ दिवसानंतर वाजतगाजत प्रकट झाले. विविध प्रसिदधी माध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली . विशेष म्हणजे आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे आत्महत्या केलेल्या तरुणी सोबतचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत, मग अद्यापही या मंत्र्यांविरुध्द ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही असा सवाल भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
त्या मंत्र्यांच्या विरोधात एवढे पुरावे समोर येऊनही अजून काय सिद्ध होणे बाकी आहे ? राज्य सरकार अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका का घेत आहे. राज्य सरकार त्या प्रकरणावर कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही आहे ? असे सवालही दादा पाटील यांनी उपस्थित केले आहेत. सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा या ठाकरे सरकारने ओलांडली असल्याची टीका करताना ते म्हणाले की, या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत ? महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण तुमच्याकडून अपेक्षित असताना तुम्ही आपल्याच मंत्रिमंडळातील एका आरोपीला वाचवत असल्याचा आरोप करतानाच पाटील यांनी स्पष्ट केले की, त्या तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

आया बहिणी सुरक्षित नसतील तर राज्यात राष्ट्रपती राजवट जळगांव प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असून जळगाव येथील वसतिगृह प्रकरणांवरुन संताप व्यक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *