Breaking News

भाजपाच्या दोन मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघात घुसली महाविकास आघाडी फडणवीस, पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा गड झाला खिळखिळा

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांकरीता झालेल्या निवडणूकांत मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातील जागा राखता आल्या नाहीत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पुणे पदवीधर मतदारसंघातील एक जागा भाजपाकडे होती. मागील काही वर्षापासून या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रतिनिधीत्व करत होते. मात्र या दोन्ही मतदारसंघापैकी पदवीधर मतदारसंघतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण लाड तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसगांवकर हे विजयी झाले. मात्र पुणे जिल्ह्याचे खासदार भाजपाचे गिरीष बापट, आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले आमदार चंद्रकांत पाटील असून महापालिकेवरही भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे या दोन्ही जागा भाजपा आपल्या ताब्यात राखेल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु भाजपाला या दोन्ही जागा राखता आल्या नाहीत.
तर नागपूर हा भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. तसेच या भागातून राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रतिनिधीत्व करतात. त्याचबरोबर येथील महापालिकेवरही भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे येथील पदवीधर मतदारसंघातील जागा भाजपा राखेल असे सांगण्यात येत होते. परंतु या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना आपले राजकिय वजन राखता आले नाही. त्यामुळे या ठिकाणीही महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकल्याने ही जागा राखता आला नाही. या दोन्ही बड्या नेत्यांच्या मतदारसंघातच जर जागा राखता येत नसतील तर राज्यात हातातून गेलेली सत्ता काय मिळविणार असा सवाल भाजपा कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे आगामी काळात पक्ष नेतृत्वातील बदलाची शक्यता असून तशी मागणी केंद्रीय नेतृत्वांकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान या निवडणूकीत धुळे-नंदूरबारची जागा वगळता दोन काँग्रेस, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका अपक्ष निवडूण आल्याने भाजपाच्या अर्थात चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यातील फोलपणा उघडकीस आल्याचे मतही भाजपामधील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.

Check Also

देवेंद्र फडणवीसांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नरांना भेटून केली ही मागणी स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठ्यासाठी सहकारी, जिल्हा बँकांना परवानगी द्या!

मुंबई: प्रतिनिधी स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठा करता यावा, यासाठी राज्य सहकारी बँक, जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *