Breaking News

खडसे, तावडे, महेता, पुरोहीत, सवरा, बावनकुळे, कांबळेंची नावे भाजपाच्या यादीतून गायब काँग्रेस, राष्ट्रवादीतील आयारामांना पहिल्या यादीत स्थान

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी भाजपा-शिवसेना यांची युती झाल्याची प्रसिध्दी पत्रकान्वये घोषणा करत भाजपाने पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत विद्यमान मंत्रिमंडळातील बावनकुळे, तावडे यांची नावे वगळली तर माजी मंत्री असलेल्या महेता, कांबळे, सवरा आणि खडसे यांचीही नावे वगळण्यात आल्याचे दिसून येत आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे वगळण्यात आली आहेत. तर माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आदीवासी मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचीही नावे वगळण्यात आली आहेत. याशिवाय भाजपाचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे यांचेही नाव वगळण्यात आले आहे. याशिवाय विधानसभेतील भाजपाचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांचेही नाव वगळण्यात आले आल्याने त्यांचे तिकिट कापले की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केलेले उस्मानाबादचे नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीतसिंग, वडाळा येथून कालीदास कोळंबकर, अकोलेतून मधुकर पिचड यांचे सुपुत्र वैभव पिचड, शिर्डीतून राधाकृष्ण विखे-पाटील, माण येथून जयकुमार गोरे यांना पुन्हा तेथूनच उमेदवारी दिली.
याशिवाय नवी मुंबईचे गणेश नाईक आणि अन्य नेत्यांना अद्याप उमेदवारी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *