Breaking News

राज्यातील या भागात बर्ड फ्लूची लागण कोंकण, प.महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील पक्षांमध्ये बर्ड फ्लू: ११ दिवसात ५ हजार ९८७ पक्षांचा झाला मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोंकणातील ठाणे जिल्हा आणि दापोली, रायगडसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर तर मराठवाड्यातील बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड तसेच विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, नागपूर, गोंदियाबरोबर नाशिक येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत ५९८७ कावळे, कबुतरे, बगळे आणि कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पशु आयुक्तालयाने एका प्रसिध्दी पत्रकान्वये आज दिली.

राज्यात १६.०१.२०२१ रोजी रात्री ७ वाजेपर्यंत कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, ठाणे १%. रायगड ३०. पुणे ४. सातारा १९, सोलापूर २५, नाशिक १, अहमदनगर २४, औरंगाबाद २६, बीड ५७, परभणी ३५, उस्मानाबाद २८, हिंगोली २४, अमरावती ७५, यवतमाळ ३२, नागपूर २९० व गोंदिया ५० अशी, ७४५ मृत्यू पावलेली आहेत. बगळे, पोपद, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई ६, ठाणे १६, रायगड १, पुणे १ नांदेड ३, यवतमाळ ३ व अकोला २, एकूण ३२ इतर पक्षांचा आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. कावळ्यामध्ये विविध जिल्ह्यात ठाणे ३३, रत्नागिरी, पुणे ३. कोल्हापूर २, नाशिक ७, औरंगाबाद २. बीड १ व उस्मानाबाद ४. अशा प्रकारे एकूण राज्यात ५९ मृत पावलेले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील १६,०२.२०२२ रोजी रात्रो ७ वाजेपर्यंत एकूण ८३६ पक्षी मृत पावलेले आहेत. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ  येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. ८-०१-२०२१ पासून आजतागायत एकूण ५९८७ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली.

पुर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथून प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, घोडबंदर जि.ठाणे व दापोली या ठिकाणाचे कावळे आणि बगळे तसेच मुरूंबा (ता. जि परभणी या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पॅथोजेनिक एव्हीयन एन्फ्लूएन्झा (एच ५, एन १ या स्ट्रेन )  करीता आणि बीड़ येथील कावळ्यामधील नमूने (एच ५, एच८ या स्ट्रेन) पॉझिटीव्ह आलेले आहेत. १५.०१.२०२१ रोजी, पुर्वी पाठवलेल्या नमुन्याचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीप उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कुक्कुट पक्षामधील काही नमुने पॉझिटीव्ह आले असून त्यात परभणी जिल्ह्यालील कुपटा ता. सेलू आणि पेडगाव ता. परभणी, लातूर जिल्ह्यातील तोंदर वंजारवाडी ता. उदगीर आणि कुर्द्वडी ता. औसा, नांदेड जिल्ह्यातील पापलवाडी ता.माहूर आणि नावान्याचीवाडी ता. कंधार. पुणे जिल्ह्यातील चांदे ता. मुळशी तसेच बेरीबे ता. दौंड, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बीड जिल्ह्यातील लोखंड़ी सावरगाव, अहमदनगर जिल्हातील श्रीगोंदा, रायगड जिल्ह्यातील पेण येथील नमुन्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे आतापर्यंत सात जिल्ह्यातील कुक्कुट पक्षाचे नमुने बर्ड फ्लू साठी पॉझिटीव्ह आले आहेत. अमरावती व अकोला जिल्लातीत कुक्कुट पक्षाचे नमुने नकारार्थी आहेत

कृक्कुट पक्षामधील नमुने पॉझिटीव्ह आल्यानुसार, सदर क्षेत्रास नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्यात आले आहे. या निर्बंधानुसार बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या मुरूंबा (ता. जि. परभणी) येथील सुमारे ३४४३ व केंद्रेवाढी, ता. अहमदपूर येथील सुमारे ११०६४ कुक्कुट पक्षी व सुकनी ता. उदगीर जिल्हा लातूर येथील सुमारे २८ कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

१५.११.२०२९ रोजी कुक्कुट पक्षी नमुने पॉझिटीव्ह आढळून आलेल्या पोल्ट्री फार्मपासून ( १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया. परभणी जिल्ह्यातील कुपटा ता. सेलू येथे ७०४ आणि पेडगाव ता. परभणी येथे ३. लातूर जिल्हयातील तोंदर वंजारवाडी ता. उदगीर येथे २४६ कुक्कुट पक्षी व ६० अंडी. आणि कुर्द्वडी ता. औसा येथे ५३५. कुक्कुट पक्षी ८६ कबुतरे, नांदेड जिल्यातील पापलवाडी ता. माहूर येथे ६२३ कुक्कुट पक्षी ४५९ अंडी आणि नावान्याचीवाडी ता. कंधार येथे ६४०, पुणे जिल्ह्यातील चांदे ता. मुळशी येथे ५१३९ तसेच बेरीबे ता. दौंड येथे ४१८, सोलापूर जिल्यातील मंगळवेढा येथे ६००, बीड जिल्यातील लोखंडी सावरगाव येथे १२४४, रापगड जिल्ह्यातील पेण येथील २८१ कुक्कुट पक्षामध्ये करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खंडाला अरणी येथील मोर एच५ एन१ पॉझिटीव्ह आढळून आला आहे. तथापि मुंबई घोडबंदर (जि.ठाणे), दापोली खंडाला अरणी जि. यवतमाल व बीड येथे सर्वेक्षण सुरु ठेवण्यात आले आहे.

बर्ड फ्तरोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशने प्राण्यामधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियत्रण अधिनियम, २००१ अधिनियमान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार अधिसूचनेनुसार २.०१.२०२१ नुसार संबधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. या संदर्भात सर्व पोल्ट्री धारक तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किवा स्थलांतरीत होणा-या पक्षाचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यास याची माहिती द्यावी तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करून त्याची माहिती द्यावी असे आवाहन पशु आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *