Breaking News

भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे: प्रतिनिधी

भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो.

दरम्यान, भिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.  मुख्यमंत्री ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोलले असून बचाव कार्य व्यवस्थित व काळजीपूर्वक पार पाडण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

१)फातमा जुबेर बबू – स्री- २ वर्ष मयत , २) मोमीन शमिउहा शेख- पु. ४५ वर्ष जखमी , ३) कौंसर सीराज शेख – स्री २७ वर्ष जखमी , ४) रुकसार जुबेर शेख- स्री २५ वर्ष जखमी, ५) फातमा जुबेर कुरेशी – स्री ८ वर्ष मयत , ६) उजेब जुबेर – पु. ६ वर्ष मयत , ७) असका म. आबीद अन्सारी- स्री १४ वर्ष मयत , ८) अन्सारी दानिश म. अलिद – पु वय १२ वर्ष मयत , ९) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी – पु. वय १८ वर्ष जखमी , १०) आवेश सरोजुद्दीन अन्सारी – पु. वय २२ वर्ष , ११) जुलैखा म. अली. शेख – स्री. वय ५२ वर्ष जखमी , १२) उमेद जुबेर कुरेशी – पु. वय ४ वर्ष जखमी , १३) सिराज अ. अहमद शेख – पु. वय २८ मयत ,१४) जुबेर कुरेशी – पु. ३० वर्ष मयत.

आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष), २) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष), ३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष), ४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष), ५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष), ६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष), ७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष), ८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष), ९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष), १०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष), ११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)

मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष), २)फायजा खुरेशी(पु/५वर्ष), ३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष), ४)बब्बू(पु/२७वर्ष), ५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष), ६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष), ७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष), ८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष), ९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष), १०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष).

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *