Breaking News

भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी आणि साक्षीदाराचे निधन ससून रूग्णालयात घेतला सुरेश सकट यांनी घेतला शेवटचा श्वास

पुणे : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव हल्ल्यातील  मुख्य फिर्यादी व साक्षीदार असणारे सुरेश सकट यांचे आज पुणे येथील ससून रूग्णालयात  निधन झाले. भीमा कोरेगाव लढ्यात ते अग्रणी होते यामध्ये त्यांनी त्यांचे घरदार गमावले आहे. याच प्रकरणामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलीची पूजा सकट हीची हत्या/ आत्महत्या देखील घडवण्यात आली होती. न्याया शिवाय आणि धर्मांतराच्या इच्छेशिवाय त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ वाटत आहे

प्रचंड दुःख सहन केल्यानंतर भीमा-कोरेगाव हल्ल्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांची सतत धडपड होती. त्यांनी मातंग म्हणून जन्माला आलो तरी मातंग म्हणून मरणार नाही मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या बौद्ध धम्म रस्त्यावर जायचे आहे असे अभिवचन त्यांनी स्वतःला चैत्यभूमी येथे जाऊन दिले होते.

रात्री ११.३० वाजता ससून रूग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी नातवंडे असा परीवार आहे. पुणे pcms कॉलनीत त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले होते. मध्यंतरी भीमा कोरेगाव दंगलीनंतर त्यांचा बाईक वर अपघात झाला होता. पाठीमागून काही लोकांनी ठोकले होते. त्याची तक्रार देखील करण्यात आली होती. परंतु या अपघातानंतर त्यांची शारीरीक स्थिती बिघडली होती. पायाला सूज येत होती. नगर येथे त्यांच्या मोठ्या बंधूचे निधन झाले असताना ते नगरलाही जाऊन आले होते. मुलगी पूजा गेली असली तरी भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे यावर ते शेवटपर्यंत  ठाम होते.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *