Breaking News

कोरेगांव भिमा एल्गार परिषदेत पेशवाईचा उल्लेख केला म्हणून गुन्हा दाखल कबीर कलामंच आणि सुधीर ढवळेंवर पुन्हा गुन्हा

पुणे : प्रतिनिधी

कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकिय, सामाजिक पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. मात्र कोरेगाव भिमा येथील दंगलीचे सुत्रधार असलेल्यांवर राज्य सरकारकडून कारवाई करण्याऐवजी दलित समाजातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर आपल्या भाषणात पेशवाईला गाडा असे सांगितल्याने रिपब्लिकन पँथरचे सुधीर ढवळे आणि कबीर कलामंचच्या कलाकारांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

मागील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात सुधीर ढवळे यांच्यावर नक्षलवादी संघटनांशी संबध असल्याच्या संशयावरून देशद्रोहाचा तर कबीर कलामंचच्या कलाकारांवर नक्षलवाद्यांशी संबध असल्याच्या आरोप ठेवत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र त्यावेळी राज्य सरकारकडून ढवळे आणि कबीर कलामंचच्या कलाकारांवर करण्यात आलेले आरोप अद्याप पर्यत सिध्द करू शकले नाही. तरीही कोरेगांव भिमा च्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत ढवळे यांनी नवीन पेशवाईला जमिनीत गाडा असा उल्लेख भाषणात केल्याने त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याच्या ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. तर कबीर कलामंचच्या कलाकारांनी प्रक्षोभक गाणी गायल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नवीन पेशवाईच्या विरोधात प्रबोधनाचा कार्यक्रम गेल्या चार महिन्यापासून १६ जिल्ह्यात सुरु आहे. त्यासाठी २५० विविध सामाजिक संघटना एकत्रित आलेल्या आहेत. सामाजिक प्रबोधनाचे काम सुरु असताना हे सरकार प्रचंड घाबरलं असल्याने त्यांच्याकडून कोरेगांव भिमा येथील दंगलीच्या मागे असलेल्या सूत्रधारांना अटक न करता आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. तरीही आम्ही सरकारच्या या ददडपशाहीला घाबरणार नसल्याचे सांगत भिडे आणि एकबोटेला अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *