Breaking News

भीमा कोरेगांवबाबत मुख्यमंत्र्यांचा तात्काळ आदेश नाही म्हणून कारवाई नाही पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी

भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक यासह अन्य दोन गावांच्या परिसरात समाजकंटकांनी घातलेल्या हैदोसानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना पुढील कारवाई काय करता येईल याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी कोणतेच तात्काळ आदेश दिले नसल्याने समाजकंटकांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहीती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पेशवाईच्या पाडावाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातील दलित मोठ्या प्रमाणावर भीमा कोरेगांव येथे जमा झाले. मात्र त्यांच्यावर स्थानिक भागातील समाजकंटकांनी दगडफेक करत या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनाही या ठिकाणी दगडफेकीतून वाचण्यासाठी पोलिस संरक्षणात एका घराच्या आडोश्याला थांबावे लागल्याची माहिती बंदोबस्ताला असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

ही घटना घडत असताना पुणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांनी समाजकंटकांवर कारवाई करण्याबाबत आणि या चारही गावांमध्ये संचारबंदी करण्याबाबत राज्यमंत्री कांबळे यांना विचारणा केली. मात्र त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणतीही कारवाई करायची नसल्याचे सांगितले. त्यानंतर बराच काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपाची वाट संबधित मंत्र्यासह पोलिस यंत्रणेने पाहीली. मात्र मुख्यमंत्र्यांकडून संध्याकाळी उशीराने निरोप आल्याचेही या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले की, त्या ठिकाणी घडलेल्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्याना दिली. त्यांचा निर्णय आल्यानंतर पोलिस आपली कारवाई करतील.

अखेर त्या चार गावांत संचारबंदी

भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक, शिक्रापूर यासह चार गावांमध्ये पोलिसांनी संध्याकाळी उशीरा संचारबंदी लागू केली असून घराच्या बाहेर प़डण्यास गावकऱ्यांना मज्जाव करण्यात आला आहे. तसेच या चारही गावांमध्ये पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे. तसेच दलित समाज आणि स्थानिक भागातील नागरीकांमध्ये समेट घडावा यासाठी दलित आणि सवर्ण समाजातील नेत्यांची पुण्यात बैठक होणार असून त्यानंतर संबधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी रात्री उशीरा दिली.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …