Breaking News

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनलाही मिळाली परवानगी तज्ञ समितीकडून आज मान्यता

नवी दिल्ली: प्रतिनिधी

कोरोनावरील उपचारासाठी काल सीरम इन्स्टीट्युटच्या कोविशिल्ड या लसीला परवानगी दिल्यानंतर आज भारत बायोटेक-इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टीट्युटच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या को व्हॅक्सीनलाही आज केंद्र सरकारच्या तज्ञ समितीने मान्यता दिली. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत ही लस वापरता येणार आहे.

कोरोनावरील औषधांच्या पडताळणीसाठी सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या तज्ञ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच हैद्राबादस्थित लस बनविणाऱ्या कंपनीनेही त्यांच्या लसीला आपतकालीन परिस्थितीत वापर करण्याची परवानगी मिळावी यासाठी औषधासंबधीचा डेटा आणि ट्रायल घेतलेल्यांची माहिती नुकतीच या समितीला सादर केली. या लसीलाही मान्यता मिळाल्यास भारतात तीन लशी उपलब्ध होतील.

Check Also

वैद्यकीय वापराकरीता ८० टक्के ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *